प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये कधी माणसांची प्राण्यांशी मैत्री तर कधी प्राणी एकमेकांवर हल्ला करताना दिसतात. आता पुन्हा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, जो कल्पनेच्या पलीकडचा आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला सिंहाला आपल्या कडेवर घेऊन रस्त्यावरून चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यापासून बराच चर्चेत आला आहे. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होतोय, कोणीही इतका खतरनाक सिंह आपल्या कडेवर घेऊन कसा उचलू शकतो? कारण सिंह किती धोकादायक असतात, हे सर्वांना माहीत आहे.
या जगात कोण, कधी, काय करेल, काहीच सांगता येत नाही? हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हेच वाटेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात एक महिला सिंहाला कडेवर घेऊन कुठेतरी जात असल्याचं दिसत आहे. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झालं असून सोशल मीडियावर याचा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ कुवेतचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सिंह पाळलेला असून तो घराबाहेर पडला होता. कुटुंबीय या सिंहाचा शोध घेत होते आणि तेव्हाच तो रात्री रस्त्याने चालताना दिसला आणि त्यानंतर महिलेने त्याला आपल्या कडेवर उचलून घरी आणलं.
आणखी वाचा : VIRAL : सासऱ्याने कुत्र्यावरच केला बलात्कार, व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर सुनेसोबतही ‘हे’ कृत्य केलं
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ अर्लाँग नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ३० लाखांपेक्षा जास्त म्हणजेच ३० लाख लोकांनी पाहिला आहे. सिंहाचं नाव जरी कोणी ऐकलं तरी लोकांमध्ये घबराट पसरते, पण या महिलेने ज्या पद्धतीने सिंहाला आपल्या कडेवर घेतलंय, ते पाहून कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओवर नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.