पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील एका तरुणाने एका मिनिटात सर्वाधिक पुशअप मारत गिनीज वर्ल्ड बुक मध्ये रेकॉर्ड केला आहे. कुवर अमृतबीर सिंग असे या तरुणाचे नाव असून त्याने कोणतीही जिम न लावता किंवा ट्रेनिंग न घेता हा विक्रम केला आहे. वयाच्या अवघ्या वीस वर्षांत त्याने मिळवलेल्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अमृतबीर पहाटे ४ वाजता उठून दिवसाची सुरुवात करतो. त्यानंतर सकाळी दोन तास आणि नंतर संध्याकाळी दोन तास तो नियमित सराव करतो. हा पराक्रम साधण्यासाठी त्याने सलग २१ दिवस कठोर दिनचर्या पाळली. त्याने यावर्षी ८ फेब्रुवारीला विक्रम करण्याचा प्रयत्न केला. २८ जुलै रोजी त्याच्या रेकॉर्डची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने पुष्टी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृतबीरने मुलाखती दरम्यान सांगितले की, तो प्रोटीन सप्लिमेंट्स वापरत नाही. घरी शिजवलेले अन्न खातो. दही, दूध, लोणी आणि तूप हा त्यांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. २०२१ मध्ये, त्याने एका मिनिटात नकल पुश-अप्स करणारा सर्वात तरुण म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचा किताब जिंकला. तसंच ३० सेकंदात जास्तीत जास्त ३५ सुपरमॅन पुश-अप करणारा सर्वात कमी वयातील तरुण म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा किताबही जिंकला.

( हे ही वाचा: Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांचा नितीन गडकरींना थेट सवाल; मी बोगद्यातून जाणं पसंत करेन पण…)

गेल्या वर्षी, त्याला समाजात बदल आणण्यासाठी बांधिलकी आणि धैर्यासाठी प्रदान केलेल्या कर्मवीर चक्र पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. महत्वाचं म्हणजे, या तरुणाचे जगभरातील फॉलोअर्ससह इंस्टाग्रामवर १७१ लाख फॉलोअर्स आहेत. त्याच्याकडे एक युट्युब चॅनेल देखील आहे जे वर्कआउट तंत्रांवर लक्ष केंद्रित करते.

( हे ही वाचा: नोएडाचा ट्विन टॉवर कोसळताच ट्विटरवर झाला मीम्सचा वर्षाव; वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही)

याशिवाय, त्याने केलेल्या उपकरणांच्या संग्रहामध्ये १० किलोपासून सुरू होणारे आणि ४५ किलोपर्यंत जाणारे विविध प्रकारचे डंबेल समाविष्ट आहेत. या छोट्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरून बनवल्या जातात. हे आकारात कापले जातात, नंतर सिमेंटने भरले जातात आणि काही दिवस उन्हात वाळवले जातात. लोखंडी रॉड वापरून ते एकत्र ठेवले जातात. तर काही सिमेंटच्या फरशा, बांबूच्या काड्या, टाकाऊ टायर आणि विटा वापरून बनवल्या जातात.तो म्हणतो की शरीराच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करणारी उपकरणे तो नवीन शोधण्याचा आणि बनवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, आपले हात मजबूत करण्यासाठी, त्याने लोखंडी सळ्या, दोरी आणि विटांनी बनविलेले उपकरण बनवले आहेत. अमृतबीरचे वडील आणि काका खेळ शौकीन होते आणि या दोघांनी त्याला लहानपणापासूनच फिटनेस घेण्याची प्रेरणा दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kuwar amritbir singh punjab teen who never went to gym wins guinness world record for most clap pushups gps