अमेरिकेतला प्रसिद्ध चेहरा, मॉडेल अभिनेत्री काइली जेनर हिनं पुन्हा एकदा अब्जाधीशांच्या यादीत आपलं स्थान पटकावलं आहे. काइली ही वयाच्या २१ व्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत विराजमान झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किम कार्दाशिअन हिची ती सावत्र बहिण आहे. ‘काइली कॉस्मेटिक्स’ या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती सम्राज्ञी आहे. २०१५ च्या अखेरीस काइलीनं ‘काइली कॉस्मेटिक्स’ कंपनीची स्थापना केली. ओठांना अधिक आकर्षक करण्यासाठीची सौंदर्यप्रसाधनं ही कंपनी तयार करते. काइलीची २०१८ मध्ये संपत्ती ही एकूण ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात होती असं ‘फोर्ब्स’ मासिकानं म्हटलं होतं. ‘फोर्ब्स’ मासिकानं जगातील अब्जावधींची यादी जाहीर केली. या यादीत तिनं स्थान मिळवलं आहे. गेल्यावर्षी काइलीनं फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गलाही मागे टाकलं होतं.

याआधी मार्क झकरबर्ग वयाच्या २३ व्या वर्षी अब्जाधीश झाला होता तर काइलीनं विसाव्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत विराजमान होण्याचा मान मिळवला होता. तिनं मार्कचा विक्रम मोडला होता.