लडाख वाहतूक पोलिसांनी एप्रिल अखेरपर्यंत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १.५० कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत हा दंड वसूल करण्यात आला, त्यांनी केंद्रशासित प्रदेशात पर्यटन वाढण्यापूर्वी वाहतूक नियमांची अंमलबजावणी मोहीम राबवली. एप्रिल २०२२ अखेरपर्यंत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लडाख वाहतूक अधिकाऱ्यांने १,५७,२५,७५० रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या तीन दिवसांत ७६१ वाहतूक चलन जारी करण्यात आले असून उल्लंघन करणाऱ्यांना २,८२,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

२८ मे रोजी, वाहतूक पोलिसांनी लेह आणि कारगिल जिल्ह्यांमध्ये वेगवान वाहन चालवणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, परवाना नसताना वाहन चालवणे आणि चुकीचे पार्किंग यांसारख्या उल्लंघनांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारगिल-द्रास रोड, कारगिल-शंकू रोड, कारगिल-लेह रोड, लेह-नुब्रा रोड, लेह-उपशी रोड अशा विविध ठिकाणी ऑपरेशन सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष नाके तयार करण्यात आले आहेत.

(हे ही वाचा: Video: …म्हणून सी लिंकवर उतरु नका; दोघांच्या अपघाती मृत्यूचं अंगावर काटा आणणारं वांद्रे-वरळी सी लिंकवरील CCTV फुटेज व्हायरल)

मोटार वाहन कायद्याच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी वाहतूक अधिकारी स्पीड रडार गन आणि अल्कोमीटरसह आधुनिक वाहतूक उपकरणे वापरत आहेत. वाहतूक पोलिस अधीक्षक (एसपी) मोहम्मद रफी गिरी यांनी सांगितले की, मद्यपान करून वाहन चालवणे, रस्त्यावर मारामारी करणे, धोकादायक वाहन चालवणे आणि हाय-बीम-लाईट वापरणे याविरुद्धही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोतला बिबट्या तुम्ही शोधू शकता का? बघा प्रयत्न करून)

जोडप्याला ५० हजार रुपयांचा दंड

लडाखमध्ये सुट्टी घालवणाऱ्या जयपूरमधील एका जोडप्याला लेह जिल्हा पोलिसांनी हुंदर गावात वाळूच्या ढिगाऱ्यावर कार चालवल्यामुळे ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. “हुंडर, एसडीएम नुब्रा येथे वाळूच्या ढिगाऱ्यावर गाडी न चालवण्याच्या सूचनांचे उल्लंघन करताना पर्यटक वाहन आढळून आले. जयपूर दाम्पत्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.” असं पोलिसांनी सांगितले. लेह जिल्हा पोलिसांनी पर्यटकांना वाळूच्या ढिगाऱ्यांवरील वाहने न चालवण्याची विनंती केली आहे. कारण, असं केल्यास नैसर्गिक लँडस्केपचे नुकसान होते.

Story img Loader