Viral Video: नुकत्याच काही महिन्यांपूर्वी महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या असून, त्यांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. परंतु, काही महिलांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक जण सरकारच्या या योजनेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. सध्या एका महिलेचा या संदर्भातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर लोक कधी काय शेअर करतील ते सांगता येत नाही. अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण हल्ली मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असतो. सध्या एका महिलेने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवरून असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती असे काहीतरी बोलत आहे. जे पाहून नेटकरी विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही महिला सुरुवातीला म्हणतेय, “मुख्यमंत्री तुम्ही माझ्याबरोबर हे बरोबर नाही केलं. सगळ्या बायकांच्या खात्यांवर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळाले; पण माझ्या खात्यावर काहीच आलं नाही. तुम्ही माझे सख्खे भाऊ नाही; माझा मला सख्खा भाऊ आहे. तुमच्या पैशाची कशाला वाट बघू? शेवटी रक्ताचा तो रक्ताचा..!” हा व्हिडीओ शेअर करताना त्या व्यक्तीने त्या व्हिडीओला ‘मुख्यमंत्र्याची सावत्र बहीण’, असे कॅप्शन दिले आहे.
या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @all_status_creator___ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्सच्या कमेंट्स चर्चेत आल्या आहेत.
हेही वाचा: अरे देवा! रील बनवता बनवता दोन बहिणींमध्ये झाली मारामारी; VIDEO पाहून युजर्सला आलं हसू
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने लिहिलेय, “असं का केलं साहेब.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हो, ना शेवटी रक्ताचा तो रक्ताचा.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “आज्जी, रक्ताचा तो रक्ताचाच असतो; पण ज्यांना भाऊ नसतो. त्यांना हा भाऊ कामी येतो. तुम्हाला कधी तुमच्या भाऊंनी १५०० रुपये महिना दिलेत का? आमच्यासाठी हेच भाऊ… आज्जी मला माफ करा; पण असं काही बोलू नका.” चौथ्या युजरने लिहिलेय, “नंतर मिळतील निवडणूक लागल्यावर.”