आजच्या काळात दिल्ली मेट्रो ही टीव्ही सीरियलपेक्षा कमी नाही. येथे तुम्हाला अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स आणि सीरियलशी संबंधित सर्व काही पाहायला मिळेल जे तुम्ही फक्त डेली सोपमध्येच पहाल. दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्यात कधी भांडण तर कधी अगदी कपल्सचा रोमान्सही पाहायला मिळाला.आता आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे ज्यामध्ये एक तरुण दिल्ली मेट्रोच्या महिला कोचमध्ये प्रवेश चढल आहे. आता लेडीज डब्यात चढल्यानंतर या तरुणाची काय अवस्था झाली असेल याची तुम्ही फक्त कल्पना करा. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

@gharkekalesh या ट्विटर अकाउंटवर अनेकदा मारामारीचे व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये एक तरुण दिल्ली मेट्रोच्या लेडीज डब्यात चढतो.त्यानंतर त्याचे आणि काही महिलांचे भांडण सुरू होते. कदाचित तुम्हाला माहित असेल की दिल्ली मेट्रोमध्ये पहिला डबा महिलांसाठी राखीव आहे. त्यात पुरुषांना चढण्यास मनाई आहे. कुणी असे केले तरी सुरक्षा कर्मचारी स्थानकांवर येऊन त्यांना खाली उतरवतात. पुढे हा तरुण व्हिडिओमध्ये महिलांशी वाद घालत असून मारामारी करू लागला आहे. काही मुली त्याचा व्हिडिओ बनवत आहेत तसेत छेड काढल्याचा आरोपही करत आहेत. महिला त्याला खाली उतरण्यास सांगत आहेत. तर एक महिला त्या मुलाच्या बचावासाठी येते आणि त्याला इतर महिलांपासून दूर ढकलण्यास सुरुवात करते.

या व्हिडिओला आता पर्यंत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की, जणू दिल्ली मेट्रो आखाडा झाला आहे. एकाने सांगितले की आता मेट्रोमध्ये मारामारी होणे सामान्य झाले आहे. नवे दिवस, नवे भांडण होते. एकाने सांगितले की, तो मुलगा दारूच्या नशेत असल्याचे दिसत होते. पूर्वीच्या व्हिडीओमध्ये जेवढी भांडणे दिसली होती, तेवढी या व्हिडीओमध्ये झाली नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – अजबच आहे! बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, पण कुठे? VIDEO पाहून व्हाल चकित

दिल्ली मेट्रो ही त्याच्या मेट्रो सेवेमुळे नव्हे तर त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. कारण, या मध्ये प्रवास करणारे वेगवगळे प्रवासी कधी कसे वर्तवणूक करतील, सांगता येत नाही. थोडक्यात काय तर, दिल्ली मेट्रो नियमांचे उल्लंघन करण्यासाठी हॉटस्पॉट बनली आहे. दिल्ली मेट्रोमधील असाच आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies and a guy over he stepped up into ladies coach in delhi metro video viral on social media srk