Viral video: सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी चिमुकल्यांचे शाळेतील डान्स तर कोणाचा लग्नाच्या वरातीमधील डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नऊवारी साडी नेसून या महिलांनी भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या महिलांनी गाजलेला मराठी चित्रपट ‘नवरी मिळे नवऱ्याला’मधील ‘ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली, ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली, हिचा नखरा पाहून काळीज उडतंय, हो धक-धक, धक-धक’ या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम या महिलांचे अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे शिवाय आता सारखे लाखोंचे व्ह्यूज त्याही व्हिडिओना मिळालेले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओतील डान्स पाहून नेटकऱ्यांनी डान्सचे कौतुक केलेले आहे तर काहींनी कायम या महिलांचा उत्साह पाहून यांचे कौतुक केलेले आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ vrushaharesh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही नवरी असली”. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर ताई” तर आणखी एका महिलेने “भारीच” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video goes viral on social media srk 1