Viral video: सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी चिमुकल्यांचे शाळेतील डान्स तर कोणाचा लग्नाच्या वरातीमधील डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. मकर संक्रातीच्या सणाला या महिलांनी हा डान्स केलाय. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल.

पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी १४ जानेवारीला आपण मकर संक्रात साजरी करतो. याचनिमित्तानं या सर्व महिलांनी काळ्या रंगाच्या साड्या नेसून भन्नाट डान्स केलाय.या महिलांनी जुनं मराठी गाणं “ग बाई मी पतंग उडवीत होते” या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

ग बाई मी पतंग उडवीत होते

हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही, मात्र या महिलांनी मराठी गाण्यावर असा डान्स केला आहे की, पाहून तुम्हीही थिरकायला लागाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चार महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी स्टेप अशा केल्या आहेत की, जणू काही त्या प्रोफेशनल डान्सरच आहेत. 

पाहा व्हिडीओ

संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत. प्रत्यक्ष घराची आणि घरातील प्रत्येक वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीची जबाबदारी ही गृहिणीची असली, तरी ती स्वतःही एक व्यक्ती आहे आणि तिची स्वतःची जबाबदारी ही तिच्यावरच आहे, हे प्रत्येक गृहिणीला समजायलाच हवे. स्वतःलाही वेळ देण्यासाठी आणि रोजच्या कामातून स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठीही ती बांधील आहे. दिवसभरातील २४ तासांपैकी अर्धा ते एक तास स्वतःसाठी राखीव ठेवून त्या वेळी त्या गृहिणीला जे आवडेल, रुचेल आणि ज्या गोष्टींनी ती ‘रिलॅक्स’ होईल अशी कोणतीही गोष्ट प्रत्येकीने करायला हवी. मग ते तिच्या आवडीचे काहीही असू शकते. अगदी गायन, वादन, टीव्ही, मैत्रिणी असे कोणतेही ‘स्ट्रेसबस्टर’ ती तिच्या मनाप्रमाणे करू शकेल.

Story img Loader