Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समोर येत असतात. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडी नेसून या महिलांनी चाळीतल्या छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा