मुंबईत फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक प्रयत्नांनंतरही मुंबई लोकलमध्ये तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. अशातच एका महिला तिकीट निरक्षकानी फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुलीत विक्रम केला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवास करताना आधी दहावेळा विचार करा. कारण या टीसीच्या नजरेतून आतापर्यंत असा प्रवासी सुटल्याची माहिती कधी आलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांकडूनही या टीसीचे सातत्याने कौतुक करण्यात येतं. तिकीट-तपासणी कर्मचार्यांमध्ये एवढी मोठी रक्कम गोळा करणारी ती पहिली महिला ठरली आहे.
फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटींहून अधिक दंड वसूल –
दक्षिण रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक रोझलीन अरोकिया मेरी यांनी फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल करत विक्रम केल आहे. त्यांनी फुकट्या प्रवाशांकडून थोडेथोडके नव्हे तर 1 कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे. त्यांच्या या कामगिरीचं रेल्वे मंत्रालयानंही कौतुक केलं आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर ही माहिती शेअर केली आणि त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेबद्दल त्यांचं कौतुक केले.
पाहा पोस्ट –
हेही वाचा – Video viral: प्रवाशांची गर्दी, AC लोकलचा दरवाजा उघडाच? पाहा काय घडलं
तिकीट-तपासणी कर्मचार्यांमध्ये एवढी मोठी रक्कम गोळा करणारी ती पहिली महिला असल्याने सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी तिच्या कामाचं कौतुक केलं आहे.