कधीकधी असे काही प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून आपल्याला हसू आवरणं अवघड होऊन जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ दोन मुलींचा आहे. या व्हिडीओमध्ये मुलींच्या जवळ येत एक तरूणाने त्यांच्या हातात जे दिलं ते पाहून फक्त या व्हिडीओमधल्या मुलीच नव्हे तर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. मात्र, त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून तर तुम्ही पोट धरून हसाल. हा मजेदार व्हिडीओ काही तासांत शेकडो लोकांनी पाहिला आहे आणि नेटिझन्सनी त्यावर कमेंट्सचा जणू महापूरच आणलाय. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दोन मुली मोमोज खाण्यासाठी रस्त्याच्या कडेला आरामात उभ्या असलेल्या दिसून येत आहे. तेवढ्यात एक मुलगा त्यांच्या जवळ येतो. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, या मुलाच्या हातात एक वाटी असते. या दोन मुलींच्या जवळ जाऊन तो त्याच्या शूजची लेस बांधायची असल्याचं कारण देत थोड्या वेळासाठी ही वाट पकडण्यासाठी या मुलींना विनंती करतो. हे पाहून मुली सुद्धा त्याची मदत करण्यासाठी तयार होतात. मुलगा त्याच्या हातातली वाटी या मुलीच्या हातात देतो आणि त्याच्या शूजची लेस बांधण्यासाठी तो खाली वाकतो. इतक्यात पुढे जे काही होतं ते पाहण्यासारखं आहे.
मुलगा त्याच्या शूजची लेस बांधण्यास व्यस्त झालेला असताना अचानक दुसरीकडून एक तरूण मोबाईलवर बोलत बोलत या दोन मुलींकडे येतो. त्यातल्या एका मुलीने हातात पकडलेल्य वाटीत पैसे टाकून निघून जातो. त्यानंतर या दोन्ही मुलींचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो. आपण एक मदत म्हणून त्या मुलाच्या हातातली वाट पकडली पण लोकांनी आपल्याला भिकारी समजून आपल्या वाटीत पैसे टाकले, हे लक्षात आल्यानंतर या दोन्ही मुली आश्चर्यचकित झाल्या. हे पाहून त्यांच्याकडे मदतीसाठी आलेला मुलगा सुद्धा हसताना दिसून येतो. त्यानंतर आपल्यासोबत प्रॅंक झाल्याचं या दोन्ही मुलींच्या लक्षात येतं.
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा : VIRAL : अबब, भिकारी महिलेने मंदिराला दुसऱ्यांदा दान केले दहा हजार रूपये…
हा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. काही वेळाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. लोक कमेंट करून यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.सोबतच अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.