सोशल मीडियाच्या जगात दररोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. त्यातील काही मोजकेच व्हिडीओ नेटिझन्सवर आपली छाप सोडून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे, या व्हिडीओमध्ये मुलीसोबत केलेला असा विनोद पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. हा मजेदार व्हिडीओ अतिशय कमी कालावधीत एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि त्याला १७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक सुद्धा केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेंचवर अंडी ठेवली
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये बुरखा घातलेला मुलगा एका मुलीची टिंगल करण्यासाठी बेंचवर बसल्याचं दिसत आहे. त्याच्याकडे एक कोंबडीही आहे आणि तो हातात दोन अंडी घेऊन बसतो. काही क्षणांनंतर एक मुलगी बेंचवरची रिकामी जागा पाहून तिथे बसायला जाते. ती बेंचवर बसणार तितक्यात बुरखा घातलेल्या त्या मुलाने बेंचवर काही अंडी ठेवली. त्यानंतर जे फ्रेममध्ये दिसून येतं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

आणखी वाचा : तुम्ही कधी ‘मस्का चहा’ची चव चाखलीय का? Butter Tea चा VIRAL VIDEO पाहून टी लवर्सना आश्चर्याचा धक्का

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न मंडपात नवरा-नवरी बसले अन् पावसानं हजेरी लावली, पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

या व्हिडीओमध्ये पुढे आणखी एक मजेदार प्रसंग दाखवण्यात आलाय. एक मुलगा सुद्धा बेंचवर बसत असतो. तो बसण्यापुर्वी एक मुलगा त्याच्या मागून येतो आणि त्याच्या खाली अंडी ठेवतो. त्यानंतर तो मुलगा खाली ठेवलेल्या अंड्यावर बसतो. त्यानंतर आणखी एका मुलासोबत असाच विनोद केल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! इतकी गर्दी… ‘या’ भागातला करोना पळाला का?

hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ एका प्रँक शूटचा भाग असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या फनी प्रँक व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. त्याच्या शेवटी असलेली फ्रेम सर्वात मजेदार वाटते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladka ladki ka video girl boy fun viral today google trends boy did prank with girl prp