सोशल मीडियाच्या दुनियेत प्रत्येकाला प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा आहे. काही लोक अजब कृत्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक फोटो आणि व्हिडिओवर लाईक मिळवण्यासाठी आपला जीवही धोक्यात टाकतात. विशेषतः युवकांमध्ये याची विशेष क्रेझ आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेल्या या गोष्टींमुळे अनेकांनी यश मिळतंही मात्र अनेकांनी फजिती होऊन बसते. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे की आजकाल लोकांना दिखावा करायला जास्त आवडतं. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एक मुलगा धावत्या बाईकवर उभं राहून डेंजरस स्टंट करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, शेवटी असं काहीतरी होतं की हा स्टंट त्याचाच अंगलट येतं. यानंतर आता तो स्टंट किंवा दिखावा करण्याचा प्रयत्न करण्याआधीही शंभर वेळा विचार करेल.

आणखी वाचा : मोबाईल फोडून न जाणो काय दाखवत होता, पण पुढे जे घडलं ते पाहून हैराण व्हाल, पाहा हा VIRAL VIDEO

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की चालत्या बाईकवर आपले हात हवेत लटकवून हा तरूण कशा पद्धतीने उभा आहे. एका हायवेवर ही बाईक धावताना दिसत असून स्टंटच्या नादात या तरूणाने आपला जीव धोक्यात घातला. हा तरूण मोठ्या ऐटीत बाईकवर उभा असतानाच तो त्याच्या हातात मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडीओ काढताना दिसून येत आहे. पण काही वेळातच त्याला तोल जाऊन हवेत असलेला हा तरूण दणकन खाली पडतो. हा तरूण अक्षरशः तोंडावर धापकन आपटला.

तर दुसरीकडे हँडल सोडून उलटा बसलेल्या तरूणाने बाईकवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र यात तो सुद्धा अपयशी ठरतो. स्टंटच्या नादात एक जण रस्त्यावर पडला तर दुसरा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपात पडला. फ्रेममधला सीन पाहून कोणालाही हसू येईल.

आणखी वाचा : आजोबा जोमात, पाहणारे कोमात! जबराट डान्सचा हा VIRAL VIDEO पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चमत्कार! पाण्याबाहेर पडताच काचेसारखा पारदर्शी होतो हा मासा; पाहा VIRAL VIDEO

हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. व्हिडिओवर लोक निरनिराळ्या कमेंट करत आहेत. प्रत्येकाचं असंच म्हणणं आहे की तरुणांनी अशाप्रकारे आपला जीव धोक्यात टाकू नये. असे घातक स्टंट करणाऱ्यांपासून दूर राहायला हवं. एका यूजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हटलं की खरंच स्टंटबाजीच्या नादात लोक आपल्या जीवाची पर्वाही करत नाहीत. तर आणखी एकाने लिहिलं की हा जीवघेणा स्टंट होता. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

Story img Loader