हल्ली छान गुलाबी थंडी सुरूये. थंडीच्या दिवसांत काही लोक पाण्यापासून दूर राहणं पसंत करतात आणि सर्वात आधी अंघोळ करणं टाळतात. हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत कुडकुडत पहाटे पहाटे अंघोळ म्हटलं तरी अंगावर काटा येतो. इतक्या थंडीत अंघोळ टाळण्यासाठी अनेकजण वेगवेगळे बहाणे शोधत असतात. हे चित्र या दिवसात प्रत्येक घरात दिसून येतं. सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो ज्या पद्धतीने अंघोळ करतोय ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगा चक्क चुलीवर ठेवलेल्या गरम पाण्यात बसून अंघोळ करताना दिसून येतोय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण आश्चर्यचकित होत आहेत. तसंच हिवाळ्यात आंघोळीची अशी कोणती पद्धत असू शकते का? असा प्रश्न विचारत आहेत.
या व्हिडीओमध्ये मुलाने थंडीच्या हुडहुडीत आंघोळीचा हा विचित्र देसी जुगाड शोधलेला दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून काही जणांना हसू आवरणार नाही तर काहींचे डोळे विस्फारले आहेत. चुली पेटवून त्यावर ठेवलेल्या कढईत बसून हा लहान मुलगा कसा पद्धतीने आंघोळ करत आहे, ते तुम्ही पाहू शकता. चुलीवरच्या या गरम पाण्यात अगदी आरामात बसून हा मुलगा निवांत अंघोळ करताना दिसून येतोय. आंघोळीच्या वेळी आणि आंघोळीनंतरही थंडी जाणवणार नाही. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे यात अंघोळीसाठी पाण्याचा अपव्यय ही होणार नाही. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. मात्र, हा जुगाड आजमावण्याची चूक करू नका, अन्यथा हा प्रयत्न जीवघेणा ठरू शकतो.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता सायकल चालवून तुम्ही बनवू शकता फळांचा रस! कसं ते पाहा…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ कू अॅपवर scorpionshot नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. लहान मुलाचा हा जुगाड पाहून लोक हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. अंघोळ करण्याच्या त्याच्या या स्टाइलवर लोक उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. पण, मुलाची ही पद्धत कोणत्याही प्रकारे चांगली म्हणता येणार नाही, असं करणं कुणासाठीही अत्यंत धोकादायक असू शकतं.
आणखी वाचा : नवरदेवाच्या जबरदस्त डान्सपुढे नवरी सुद्धा फिकी पडली; वऱ्हाडी सुद्धा झाले अवाक, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिलं आहे की, ‘पाणी वाचवण्याचा हा जुगाड खूपच भयानक आहे.’ या व्हिडीओवर युजर्सकडून अशाच प्रतिक्रिया येत आहेत. बरेच लोक मुलाचं वागणं खूप धोकादायक असल्याचं सांगत आहेत.