इंटरनेटवर कधी कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून असं घडू शकतं यावर विश्वास बसत नाही. कधी कधी प्राणी माणसांशी असं वागतात, की जसं त्यांना खूप जास्त कळतं. कदाचित हे खरंही आहे, फक्त आपल्याला त्यांची भाषा समजत नाही. पण तरीही काही प्रसंगात त्यांचं वागणं समजून येतं. काही लोक अशा प्रसंगांचे व्हिडीओ करतात, जे नंतर इंटरनेटवर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही तुमचं हास्य आवरु शकणार नाहीत. यामध्ये एक तरुणी बकरीसोबत व्हिडीओ शूट करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेल्फी व्हिडीओ घेण्याची अनेकांना सवय असते, कधी कधी त्या नादात असे काही प्रसंग घडतात जे पाहून कुणालाही हसू आवरणार नाही. अशाच एका प्रसंगाचा मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी बकरीच्या पिल्लूसोबत सेल्फी व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न करत असते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरी-नवरदेवावर पैसे उडवण्याचा उत्साह नडला, थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन पडला

व्हायरल होत असलेल्या या मजेदार व्हिडीओमध्ये एक मुलगी मोकळ्या मैदानात आरामात बसलेली दिसत आहे. काही क्षणांनी एक बकरीही त्याच्याजवळ आली. यानंतर फ्रेममध्ये जे काही दिसतं तेही खूप मजेदार आहे. बकरीच्या पिल्लूने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. मुलगी या बकरीच्या पिल्लूला घेऊन तिचं चुंबन घेण्यास सुरुवात केली. हे पाहून शेळीला राग आला आणि तिने तिच्यावर आरडाओरडा सुरू केला. प्रत्युत्तरात ती मुलगीही तिच्यासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करते. यानंतर शेळी जे काही करते ते पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

आणखी वाचा : या कलाकाराच्या कलाकृतीला सलाम!, गोठलेल्या बर्फात बनवला महाकाय साप, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : छतावरून खाली उतरताना शिडीच्या पायऱ्यांवरून घसरला चिमुरडा, हा VIRAL VIDEO पाहून सारेच झाले सुन्न

हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की, बकरीच्या पिल्लाला चुंबन घेणं आवडलेलं नाही. त्यामुळे चुंबन नको घेऊ असं सांगतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४.१ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला ६३. २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : माशाच्या तोंडात सिरिंज टोचल्यानंतर शेकडो पिल्ले बाहेर पडली! असं दृश्य तुम्ही कधीच पाहिलं नसेल!

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भरपूर मजेदार कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओखालील हे कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladki aur bakri girl goat funny video comedy 2022 see what happened next prp