Viral video: महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत याकरता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योनजेसाठी राज्यभराली कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तर, आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधीही मिळाला आहे.यावेळी महिला वर्ग खूश झाला मात्र दुसरीकडे पुरुष वर्ग मात्र आमच्यासाठी काय असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल विचारत आहे. हा लाडक्या भावांवर अन्याय आहे, फक्त बहिणींनाच का योजना असे अनेकजण सवाल करत असताना आता थेट मुख्यमंत्र्यांना तरुणांनी गाण्यातूनच विनंती केलीय. लाडक्या भावाचं हे गाण ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.
आतापर्यंत तुम्ही डीजेवर अनेक गाणी ऐकली असतील तसेच डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांवर डान्स केला असेल. पण या व्हिडीओमध्ये असं गाण वाजलं की ऐकणारे ऐकत राहिले आणि नाचणारे नाचत राहिले. असं काय आहे हे गाणं तुम्हीच पाहा. “आमचं लग्न होईना कुणी पोरगी देईना, हाताला काम नाही, मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री मुलांसाठी पण काढा लाडका भाऊ योजना.” असं गाण हे डीजेवर वाजत आहे. यावेळी सगळे तरुण या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हे गाणं इतक्या भन्नाट पद्धतीने गायलंय की ऐकल्यावर आपसूकच हसू येतंय. तर तरुणही यावप बेभान होऊन नाचत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा फोटो rubabwala_551 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला साहेब आहे आमच्या साठी काही योजना असं क्ॅप्शन दिलं आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, “भाऊ लाडका नाहीये.” तर आणखी एकानं कमेंट केलीय, “एक नंबर”‘
लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार?
अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत. परंतु, अद्यापही पैसे आलेले नाहीत, असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तत्काळ लिंक करून या. या प्रक्रियेला फार दिवस लागत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक झाल्यास तुमच्या खात्यात पैसे येतील. जर लिंक असूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही थोडावेळी प्रतिक्षा करू शकता