Maharashtra Ladki Bahini Yojana Fact Check : द क्विन्ट : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन नाशिकमधील एका कुटुंबाने नुकतीच नवी कार खरेदी केल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमधील फोटोत कारशेजारी उभे असलेले अनेक जण दिसत आहेत. पण, खरंच अशाप्रकारची कोणती घटना घडली का याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एका कुटुंबात तीन महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नवी कार खरेदी केली, असा दावा करणारी एक पोस्ट व्हायरल होतेय.
(अशाच प्रकारच्या पोस्ट्स तुम्ही खाली पाहू शकता.)
तपास :
वस्तुस्थिती काय आहे?: हा दावा दिशाभूल करणारा आहे.
व्हायरल फोटो सप्टेंबर २०२१ मधील आहे, जो महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजने’च्या घोषणेपूर्वीचा आहे.
या फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च केलं तेव्हा ‘जलक्रांती ग्रुप’ नावाच्या फेसबुक हँडलवर पोस्ट केलेला सेम तोच फोटो आम्हाला आढळला.
१२ सप्टेंबर २०२१ रोजी ‘जलक्रांती कुटुंबात आणखी एका कारची भर पडली!!.’ असे कॅप्शन त्या फोटोबरोबर देण्यात आले होते.
टॅग केलेले ठिकाण गुजरातमधील सुरत येथील होते.
टीम वेबकूफने या फोटोबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्या संबंधित फेसबुक अकाउंटशी संपर्क साधला असून प्रतिसाद मिळताच हा रिपोर्ट अपडेट केला जाईल.
महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजने’विषयी :
बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै २०२४ मध्ये या योजनेची घोषणा केली होती.
सर्व पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील आणि जुलै २०२४ पासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते.
तत्कालीन सरकारने या योजनेचा विस्तार केला होता आणि महिलांना मदत मिळण्यासाठी अटी शिथिल केल्या होत्या, ज्यात १५ जुलै २०२४ वरून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
व्हायरल फोटोचा संदर्भ किंवा स्थान आम्ही स्वतंत्रपणे पडताळून पाहू शकलो नसलो तरी हा फोटो महाराष्ट्रात योजनेच्या घोषणेपूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निष्कर्ष :
ही प्रतिमा जुनी असून महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजने’शी संबंधित नाही.
(ही कथा मुळतः द क्विन्टने प्रकाशित केली आहे आणि ‘शक्ती कलेक्टिव्ह’चा एक भाग म्हणून ‘लोकसत्ता’ याचे भाषांतर करून पुनर्प्रकाशित करीत आहे.)
https://www.thequint.com/news/webqoof/marathi/family-nashik-buys-car-maharashtra-ladki-bahin-yojana-scheme-viral-marathi-fact-check#read-more#read-more