Ladki bahin yojana sasu sun dance video viral: सोशल मीडियावर दररोज हजारोंच्या संख्येने व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात मजेशीर, डान्सच्या व्हिडीओंची संख्या जास्त आहे. सासू-सुनेच्या नात्याचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. परंतु, सध्या सासू-सुनेचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो सध्या चर्चेत आहे.

सध्या राज्य सरकारने अमलात आणलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गेल्या महिन्यात रक्षाबंधनाच्या आधी बहिणीला ओवाळणी म्हणून अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली. त्यामुळे अनेक महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष

हेही वाचा… खाकीतला हिरो! चालत्या लोकल ट्रेनखाली अडकला माणूस अन्.., जीवघेण्या अपघातातून मुंबई पोलिसाने कसा वाचवाला जीव, पाहा VIDEO

या संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय, ज्यात सूनबाईचे लाडकी बहीण या योजनेचे पैसे आले म्हणून सासू आणि सुनेने जबरदस्त डान्स केला.

व्हायरल व्हिडीओ ( Viral Video)

सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडीओत सासू-सून जबरदस्त ठेका धरताना दिसतायत. “सूनबाईचे ३,००० रुपये आले” असं या व्हिडीओवर लिहिलं आहे. तर हा व्हिडीओ @nakti_family0803 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “सूनबाई चल पार्टी करू” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर ६९ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज आणि १६०० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

हेही वाचा… दिव्यांग भक्ताने पायाने रेखाटलं ‘लालबागच्या राजा’चं चित्र, VIDEO पाहून कराल कौतुक

युजर्सच्या प्रतिक्रिया (Users Comments)

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, आजी कुठे होता तुम्ही. तर दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “आजी एक नंबर” तर अनेकांनी इमोजी शेअर करीत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… Amazonने चक्क दोन वर्षांनंतर केली प्रेशर कुकरची डिलिव्हरी; पोस्ट Viral होताच कंपनीने दिली प्रतिक्रिया, “आम्हाला हे…”

दरम्यान, याआधीही या सासू-सुनेने अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, जे तुफान व्हायरल झाले होते.

Story img Loader