रस्त्यावर डान्स करून व्हिडीओ शूट करणं यात काही नवीन नाही. आजकाल अनेक तरूण-तरूणी इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्यासाठी सार्वजानिक ठिकाणी परवानगी नसताना आपले व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण सार्वजानिक ठिकाणी रिल बनवताना अनेकदा नकळत काही विनोद घडून जातात, यामुळेच असे व्हिडीओ शेअर होतातच व्हायरल होऊ लागतात. तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असाल तरीही असे व्हिडीओ पाहिले तर तुम्ही नक्कीच खदखदून हसाल. असाच एका तरूणीचा रील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू अनावर होईल.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या रील व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरूणी रस्त्यावर रील व्हिडीओ शूट करण्यासाठी उभी असते. कॅमेरा ऑन होताच या तरूणीने अॅक्टींगला सुरूवात केली. नेमकं याचवेळी कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये एक सायकल चालवणारे काका दिसून येत आहेत. या व्हिडीओमधील तरूणी तिचा रिलचा व्हिडीओ बनवण्यात व्यस्त असते. पण तिच्या बाजुने सायकल चालवत पुढे गेलेले काका मात्र अगदी मागे वळून वळून या तरूणीकडे पाहू लागतात. रिलचा व्हिडीओ करणाऱ्या या तरूणीकडे मागे वळून वळून पाहण्याच्या नादात सायकलवाल्या काकांचा तोल जातो. यात सायकल थेट रस्त्यावरून थेट फुटपाथवर जाऊन पोहोचते. तरी सुद्धा, आपली सायकल रस्त्यावरून थेट फुटपाथवर पोहोचली असल्याचं भान या सायकलवाल्या काकांना राहत नाही.
कशीबशी सायकल सावरत पुन्हा हे सायकलवाले काका रील करत असलेल्या तरूणीकडे मागे वळून पाहू लागतात. अशात आणखी मागे वळून तरूणीला पाहण्याच्या नादात हे सायकल वाले काका पुढे जाऊन फुटपाथवर दुकानाबाहेर लावलेल्या पोस्टरला धडकतात की काय, अशी शंका मनात येऊ लागते. पण त्या आधीच या सायकलवाल्या काकांनी आपले पाय जमिनीला टेकवत सायकल थांबवली आणि मग पुन्हा रील बनवत असलेल्या तरूणीला मागे वळून पाहण्यात व्यस्त राहिले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्सनी यावर वेगवेगळे मीम्स देखील शेअर करण्यास सुरूवात केलीय. ‘memes.bks’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. तरूणीला पाहण्याच्या नादात सायकलवाल्या काकांची झालेली गडबड पाहून नेटिझन्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या विनोद करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ही माहिती समोर आली नाही. मात्र, नेटिझन्स या व्हिडीओचा पुरेपूर आनंद लुटताना दिसून येत आहेत.