सोशल मीडियाचे जगही खूप विचित्र आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ इथे हेडलाईन्स बनून जातात. कधी स्टंट व्हिडीओ तर कधी गोंडस प्राण्यांचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर एका १२ वर्षाच्या मुलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका मोठ्या झाडाला लागोपाठ बुक्क्यांचा मारा करतेय. हा व्हिडीओ खूप वेगळा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना त्या तरुणीची चांगलीच भुरळ पडली आहे. हा व्हिडीओ तसा जुना असून २०१७ साली शेअर करण्यात आला होता. व्हिडीओ जुना असला तरीही या व्हिडीओबाबत लोकांची उत्सुकता मात्र कमी झालेली नाही. असं नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये पाहुयात…
डेली मेलच्या २०१८ च्या रिपोर्टनुसार, या व्हायरल व्हिडीओमधल्या मुलीचं नाव इव्हानिका असं आहे. लहानपणापासून इवानिकाला बॉक्सिंगची आवड होती आणि आज तिने बॉक्सिंगमध्ये प्राविण्य मिळवलंय. तिच्या या कौशल्यामागे तिचे वडील रुस्तम सद्वकास यांना श्रेय जातं. तिचे वडील रुस्तम हे एक व्यावसायिक बॉक्सिंग प्रशिक्षक देखील आहेत. इवानिका आता तिच्या सात भांडवांना बॉक्सिंगचं प्रशिक्षण देतेय. इव्हानिका दिवसातून एक किंवा दोनदा ट्रेन करते. तिला बॉक्सिंगचं प्रचंड वेड आहे. ती बॉक्सिंगमध्ये इतकी परफेक्ट झालीये अक्षरशः ती तिच्या ठोशांनी चक्क दरवाजा किंवा झाड देखील पाडू शकते. यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हिडीओ एक प्रत्यक्ष पाहाच.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : महाकाय अजगर रस्ता ओलांडत होता, सर्व वाहने थांबली पण हा काही थांबला नाही
काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी जंगलात एका झाडासमोर उभी असल्याचे दिसत आहे. मग ते पाहून ती झाडावर ठोशांचा अक्षरशः पाऊस पाडते. लागोपाठ ती झाडावर ठोशांवर ठोशे मारताना दिसून येतेय. तिच्या प्रत्येक ठोश्याने एव्हढं मोठं झाड कमकुवत होताना दिसून येतंय. जसा तिचा ठोसा झाडावर पडतो तसंच झाडांमधून चक्क भुसा बाहेर पडताना दिसून येतोय. कोणीतरी आपल्या ठोश्यांनी झाडाला पाडल्याचं तुम्ही क्वचितच पाहिलं असेल.
आणखी वाचा : VIRAL : नवरीचा डान्स पाहून नवरदेवाची सटकली, भरमांडवात घेतला काडीमोड
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : खादाड नवरीबाई! काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण चायनीज स्नॅक्स खाण्याचा मोह काही आवरला नाही
हा व्हिडिओ क्वारंटाइन ट्रेडर्स नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहताना काही वेळासाठी जणू काही एखाद्या हॉलिवूड चित्रपटातला एखादा अॅक्शन सीन पाहतोय की काय असा भास होऊ लागतो. पण हे खरंय. प्रत्यक्षात या मुलीने आपल्या ठोश्यांनी एक झाड अगदी पोखरून काढलंय.
आणखी वाचा : टांझानियन तरुणाचा आता ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स VIDEO VIRAL, ५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हि़डीओ पाहून लोक आश्चर्य होऊ लागलेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह लोकांना आवरता येत नाहीय. लोकांनी या व्हिडीओखाली कमेंट्स सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.