देशात महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे धक्कादायक असतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. हल्ली मुलींना स्वसंरक्षणाचे धडे लहानपणापासून दिले जातात. प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरुरी आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. महिलेची छेड काढणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. महिलेनं व्यक्तीला सर्वांसमोर चांगलीच अद्दल घडवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला ट्रेनमध्ये एका व्यक्तीला चपलेने मारत आहे. त्याच वेळी अनेक लोकही उपस्थित आहेत. पुरुष महिलेला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र महिला त्याला मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ घर कलेश नावाच्या युजरने एक्सवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर लोकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. तुम्हीही पहा हा व्हायरल व्हिडिओ.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दिल्ली मेट्रोमध्ये कपलचा खुलेआम रोमान्स; Kiss करतानाचा Video झाला व्हायरल

हा व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.व्हायरल होत असलेल्या या सीसीटीव्ही व्हिडिओवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘हे खूप भयानक होते…, दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lady and a guy inside indian railways over this guy was misbehaving with her viral video srk