सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही व्हिडीओ माहितीपूर्ण असतात, काही व्हिडीओ भावूक असतात, काही भयानक असतात, तर काही अत्यंत मजेशीर असतात. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया देत असून हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये एका बाइकवर एक मुलगा आणि मुलगी बसलेले दिसत आहेत. त्यांच्या शेजारीच एक दुसरा मुलगा बाइक चालवत आहे. यानंतर अचानक ती मुलगी शेचारच्या बाइकवर लाथ मारण्याचा प्रयत्न करते. मात्र, तिचा तोल जातो आणि काही कळायच्या आतच ती रस्त्यावर पडते.

आधी खांद्यावर बसला, मग प्रेमाने पाहिले आणि नंतर…! अशी भन्नाट चोरी तुम्ही कधी पाहिली आहे का? Video Viral

काही क्षणांसाठी बाइक चालवणाऱ्या मुलाला कळतच नाही की त्याच्या मागे बसलेली मुलगी रस्त्यावर पडली. तथापि, काही अंतरावर जाऊन तो थांबतो. दरम्यान बाजूने जात असलेल्या बाइकला लाथ मारण्याची मुलीची कृती नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. मात्र तिच्याबरोबर घडलेली घटना पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना हसू अनावर झाले आहे. ते कमेंट सेक्शनमध्ये भन्नाट कमेंट्सही करत आहेत.

Video : चालत्या बाइकवर कपडे काढून तरुणांनी केले असे काही…; मात्र, पोलिसांच्या एका कृतीने मुलांची चांगलीच जिरली

व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. काही तासांपूर्वीच शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ४६ हजारांहूनही अधिक लाइक्स मिळाले आहेत. मात्र हा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला आणि या मुलीला काही दुखापत झाली आहे का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाडला आहे. एका म्हटलं, “कर्माचे फळ लगेच मिळते,” तर दुसरा युजर म्हणाला, “जसे करावे तसेच भरावे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lady falls while trying to kick another bike rider video went viral on the internet pvp
Show comments