जगभरात सध्या किकी चॅलेंजने धुमाकूळ घातल्यानंतर आता त्याचा पुढचा टप्पा सुरु झाल्याचे समोर आले आहे. अनेकांचा या चॅलेंजमुळे जीव गेल्यानंतर आता त्याची पुढची पायरी समोर आली आहे. चालत्या गाडीतून उतरुन डान्स करण्याचे हे चॅलेंज आता विमानातून उतरण्यापर्यंत गेले आहे. एका महिला पायलटनी चक्क चालू विमानाच्या कॉकपीटमधून उतरुन हे चॅलेंज पूर्ण केले. तिचा अशाप्रकारे विमानातून उतरुन डान्स केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये तिच्यासोबत विमानातील एक कर्मचारीही असल्याचे दिसत आहे.
या पायलटचे नाव एलेजेंड्रा असून कॉकपीटमधीन उठून ती खाली उतरली आणि कीकी चॅलेंजच्या किकी डू यू लव्ह मी या गाण्यावर डान्स करायला लागली. धोक्याचे म्हणजे या दोघी असा डान्स करत असताना विमान विमानतळावर पुढे पुढे जात असल्याचेही व्हिडियोमध्ये दिसत आहे. नेटीझन्सनी हा व्हिडियो अनेक वेळा पाहिला असून शेअरही केला आहे. हा व्हिडियो नेमका कोणत्या देशातील कोणत्या विमानतळावरील आहे हे मात्र समजू शकले नाही. कॉमेडियन शिगी याने या चॅलेंजची सुरुवात केली असून त्याचे लोण कमी कालावधीत खूप पसरले.
#kiki dance in pilots way
चालत्या गाडीतून काली उतरुन नाचण्याचे हे चॅलेंज आहे. नाचल्यावर पुन्हा गाडीत जाऊन बसायचं असा अत्यंत धोकादायक प्रकार ‘किकी चॅलेंज’ म्हणून समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. किकी चॅलेंजचं हे खूळ स्पेन, यूएस, मलेशिया आणि यूएईसारख्या देशांतही पसरलं आहे. विशेष म्हणजे ड्रेकच्या मूळ गाण्यात कुठेही असा स्टंट नाही. चालत्या गाडीतून बाहेर येऊन डान्स करून पुन्हा गाडीत बसेपर्यंत गाडीचा वेग १० किमी प्रति तास ठेवला जातो. गाडीत कॅमेरा ठेवून त्याचे चित्रण केले जाते. चालत्या गाडीचा दरवाजा उघडा ठेवून बाहेर येऊन नाचल्याने आपण आपला आणि इतरांचाही जीव कसा धोक्यात घालतो हे दाखवणारे व्हिडिओ पोलिसांनी पोस्ट करायला सुरुवात केली आहे. तसेच अनेक देशात बंदीही घालण्यात आली आहे.