दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट पंजाब, हरयाणा आणि मध्य प्रदेश सरकराने टॅक्स फ्री केला केला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये काश्मीरमध्ये १९९० मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवल्या आला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचेच डोळे ओले झाले आहेत. थिएटरमधून बाहेर पडणारे लोकही सोशल मीडियावर आपलं मत मांडत आहेत. या चित्रपटाची कथा आणि वास्तव याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाशी निगडीत अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात चित्रपट पाहिल्यानंतर लोकं भावुक झाल्याचं दिसत आहे. तसेच अनेकांना तर अश्रू अनावर झाले आहेत. या दरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर असल्याचा दावा केला जात आहे. अनेकांनी लालकृष्ण यांना अश्रू अनावर झाल्याप्रकरणी आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. मात्र या व्हिडीओची सत्यता वेगळीचं असल्याचं समोर आलं आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ शिकारा चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यानचा आहे. व्हायरल व्हिडीओत लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत विधु विनोद चोप्राही दिसत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. ‘शिकारा’ ७ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला. अशा परिस्थितीत लालकृष्ण आडवाणी यांनी ‘द काश्मिरी फाइल्स’ पाहत असून भावूक होत असल्याचा दावा केलेला व्हिडीओ शिकारा चित्रपटाच्या प्रदर्शनातील आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल सुरू आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रेक्षक या चित्रपटाकडे आकर्षित होत आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४.५५ कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे, इतर राज्यांमध्येही तो करमुक्त करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे काही लोक ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर विरोधही होत आहे. हा चित्रपट समाजात विष पेरण्याचे काम करेल. त्याचबरोबर काही जण या चित्रपटात दाखवण्यात आलेले तथ्य चुकीचे आहे, असल्याचं मत मांडत आहेत. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी करत आहेत.