Lal Krishna Advani Death Viral News: लाईटहाऊस जर्नालिझमला एक पोस्ट मोठ्या प्रमाणात विशेषत: WhatsApp वर शेअर केली जात असल्याचे लक्षात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निधन झाल्याचा दावा या पोस्ट मध्ये करण्यात आला होता. तपासादरम्यान आम्हाला आढळले की लालकृष्ण अडवाणी यांना अलीकडेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यापासूनच ही पोस्ट व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

X युजर @MayankYadav102 ने व्हायरल दावा आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील खोटा दावा शेअर करत आहेत. हा दावा व्हॉट्सॲपवरही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

तपास:

गूगल कीवर्ड सर्च वापरून आम्ही भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दलच्या ताज्या बातम्या तपासल्या. लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ते निरोगी आणि स्थिर आहेत अशी माहिती आम्हाला ANI वर असलेल्या बातमीत मिळाली.

https://www.aninews.in/news/national/general-news/after-being-discharged-from-hospital-veteran-bjp-leader-lk-advani-healthy-and-stable20240706205231/

९६ वर्षीय अडवाणी यांना अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, तिथे ते आदल्या रात्री उपचारासाठी दाखल झाले होते. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची दिशाभूल करणाऱ्या केंद्रीय मंत्री व्ही सोमन्ना यांच्या गलथानपणाबद्दलच्या बातम्याही आम्हाला आढळल्या. भाजपाचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निधनाच्या खोट्या बातम्यांना ते सुद्धा बळी पडले होते आणि शोक व्यक्त करून, श्रद्धांजली वाहून मोकळे झाले होते. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी याविषयी जाहीरपणे क्षमा मागून घाईत सभा सोडली होती.

https://www.deccanherald.com/india/karnataka/union-minister-v-somanna-apologises-for-homage-to-advani-gaffe-3095572

त्यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्य भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी पुष्टी केली की एल के यांची स्थीतू स्थिर आहे आणि ते सुदृढ आहेत. त्यांनी लालकृष्ण अडवाणी हे असेच निरोगी राहावेत यासाठीही त्यांनी प्रार्थना केली.

हे ही वाचा<< शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर किर्ती चक्र; वीरपत्नीनं सांगितला अखेरचा संवाद, म्हणाल्या, “आम्ही पुढच्या आयुष्याचे…”

निष्कर्ष: भाजपाचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या आठवड्यात अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते स्थिर, निरोगी आहेत आणि घरी विश्रांती घेत आहे. त्यांच्या मृत्यूचे व्हायरल दावे खोटे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lal krishna advani death news gone viral on whatsapp after bjp veteran admitted twice in week at apollo hospital check facts svs
Show comments