Lalbaug cha raja 2024: सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धूम आहे. खासकरून लालबाग-परळ या भागात गणेशोत्सवाचा एक वेगळा उत्साह, लगबग दिसून येते. लालबाग-परळ भागांत अनेक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा मुंबई शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेले आकर्षक आणि मोठमोठे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली. त्यात लालबाग, परळ, भायखळा, गिरगाव, खेतवाडी, मुंबई सेंट्रल, वडाळा या भागांतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये जनसागरच लोटल्याचं पाहायला मिळालं.
यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करीत आहेत. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लालबागच्या राजाच्या VIP लाइनमधला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, VIP लाइनमध्ये जर ही परिस्थिती असेल, तर सर्वसामान्य भक्तांचं काय ?
लालबाग, गणेश गल्ली येथील मंडळांनी उभारलेल्या आकर्षक कमानी, भारतमाता सिनेमापासून लालबाग नाक्यापर्यंत करण्यात आलेली विद्युत रोषणाई आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी उत्साही तरुण मंडळींची धडपड सुरू होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला ही रांग लागली आहे. या रांगेत मोठ्या संख्येने लोक उभे आहेत. दरवर्षी लालबागच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक येतात, दोन-दोन दिवस रांगेत उभे राहतात. अशातच गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी मुंबईतील लालबागचा राजा येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती दिसून आली.
तुम्हीही मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जात असाल, तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “माझे कोकणचो रुबाब भारी” तरुणींनी शेतात केला भन्नाट डान्स; VIDEO झाला तुफान व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ mumbaibliss, nallasopara.memes नावाच्या या दोन इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होणारे उत्सवी वातावरण, सोशल मीडियावर टाकले जाणारे फोटो, रील्स यांना ‘लाइक्स’ मिळविण्याची हौस अधिक घातक ठरत असल्याची बाब या घटनेमुळे समोर आली आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरे कमेंट केली आहे की, घरातला बाप्पाही आशीर्वाद देतो. तर आणखी एकानं म्हटलंय, “मनापासून हात जोडले की, बाप्पा कुठूनही आशीर्वाद देतो.”