Lalbaugcha raja 2024 : नवसाला पावणारा गणपती, अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करीत आहेत. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लालबागच्या राजाला जाण्याआधी नक्की विचार कराल.

मुंबईतील लालबाग हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. या मुंबईने आपल्याला स्वप्नं पाहायला शिकवलं, मेहनत करायला शिकवलं; पण याच मुंबईनं स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करण्याचीही सवय लावली. पण, हीच सवय आता नको तिथेदेखील बघायला मिळत आहे. मुंबईच्या लालबाग परिसरातला एक चित्तथरारक असा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओतली गर्दी आणि भाविकांचा बेशिस्तपणा पाहिला, तर अंगावर शहारे येतील. त्यामुळे या वस्तुस्थितीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. एकीकडे मंडळाचे कार्यकर्ते दोन महिन्यांपासून सगळं नियोजन करीत असतात. लाखोंची गर्दी सांभाळत असतात. अशा वेळी त्यांना सहकार्य करणं भाविकांचं काम आहे. मात्र, या ठिकाणी भाविकांनी कार्यकर्ते आणि पोलिसांचं काहीही ऐकलं नाही.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

दरवर्षी लालबागच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक येतात, दोन-दोन दिवस रांगेत उभे राहतात. अशातच गणेशोत्सवाच्या तिसऱ्याच दिवशी मुंबईतील लालबागचा राजा येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती दिसून आली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठा जमाव जमला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गडबड झाली; ज्यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येत आहे. त्या गर्दीमध्ये महिला आणि लहान मुलेदेखील दिसत आहेत. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो. त्यामध्ये दिसतेय की, विशेष म्हणजे पोलीस असूनही भाविक कोणतीही शिस्त पाळताना या ठिकाणी दिसत नाहीयेत. एका गेटमधून पोलीस अडवत असतानाही भाविक धक्का मारून गेट खोलून आतमध्ये येत आहेत. यावेळी महिला, पुरुष, तरुण सगळेच गेटमधून आत येण्यासाठी तुटून पडले आहेत. तुम्हीही मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जात असाल, तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mumbaicityexplore नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होणारे उत्सवी वातावरण, सोशल मीडियावर टाकले जाणारे फोटो, रील्स यांना ‘लाइक्स’ मिळविण्याची हौस अधिक घातक ठरत असल्याची बाब या घटनेमुळे समोर आली आहे.