Lalbaug cha raja 2024: लालबागचा गणेशोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या मंडपात बाचाबाची, राडा, अरेरावी, धक्काबुक्की, दमदाटी असे प्रकार काही नवे नाहीत. यापूर्वीही अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहे. कधी पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमधील राडे, कधी पोलिसांनी पत्रकारांसोबत केलेली अरेरावी, तर कधी महिलांना करण्यात आलेली धक्काबुक्की. दरम्यान आता लालगाबच्या राजाच्या दरबारातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लालबाग राजाच्या दर्शानासठी अलोट गर्दी बघायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस, पालिका कर्मचारी आणि मंडळाच्या सदस्यांकडून गर्दीचं नियोजन केलं जात आहे. दरम्यान, गणेशोत्सवात अवघ्या देशाच्या नजरा जिथं असतात त्या लालबागमध्ये यावर्षी गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मंडळाकडून दर्शन रांगांची चोख व्यवस्था करण्यात येते. यामध्ये ज्या लोकांना राजाचे चरणस्पर्श करायचे असेल त्यांच्यासाठी वेगळ्या रांगेची तरतूद केली जाते. या रांगेत लोक तासनतास उभे राहून बाप्पााच्या दर्शनाची वाट पाहत असतात. अशातच काही मंडळी थेट बाप्पाापर्यंत पोहचतात, हे एवढ्यावरच थांबत नाही तर तिथे जाऊन बाप्पााजवळ उभं राहून फोटो काढण्याचाही त्यांचा हट्ट असतो. लालबागच्या राजाचे दोन पाय आणि दोन पायांवर दोन वेगळे वर्ग. एक वर्ग श्रीमंतांचा किंवा ओळखीने आलेला तर दुसरा वर्ग सर्व सामान्यांचा, जे तासनतास रांगेत उभे राहून तिथपर्यंत पोहचलेले असतात. यावेळी दोघांना वेगळी वागणूक दिल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
Shocking Video : Pune PMT Bus Front Glass falls off due to high speed
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लालबागच्या राजाच्या दोन्ही पायांमध्ये कार्यकर्ते उभे आहेत. एका पायावर सर्वसामान्यांना ढकलत दर्शन दिलं जात आहे तर दुसऱ्या पायावर ओळखीने आलेल्या काही तरुण-तरुणींना अगदी सावकाश दर्शन घेऊ दिलं जात आहे. एवढंच नाही तर अगदी वेगवेगळ्या पोसमध्ये फोटो काढण्याची परवानगीही दिली जात आहे. व्हिडीओमध्ये जी दोन वर्गातील दरी दिसत आहे ती फक्त लालबागचा राजा मंडळापुरती मर्यादित नाही.बऱ्याच प्रसिद्ध मंडळांमध्ये सर्वसामान्यांना वेगळी वागणूक आणि श्रीमंतांना वेगळी वागणूक देणे हे प्रकार होतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: खरा पुणेकर! ओळखीनं दर्शन घेणाऱ्या भक्तांना पुणेरी शैलीत उत्तर; दगडूशेठ मंदिराबाहेरची पुणेरी पाटी एकदा पाहाच

हा व्हिडीओ andheriwestshitposting नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये यूजरने “जर देवाने माणसाला त्याच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर, एकमेकांशी भिन्न वागणूक देताना अगदी त्याच्या पायाशी पाहिले तर. जिथे एकीकडे भाविकांना बाजूला सारले जात आहे, तर दुसरीकडे दुसऱ्या वर्गाला मात्र वेगळी वागणूक दिली जात आहे. त्याला कसं वाटेल? असमानतेच्या या प्रदर्शनामुळे तो निराश होईल का?” असं लिहलं आहे. हे कॅप्शन खरंच विचार करायला भाग पाडत आहे.

Story img Loader