Lalbaugha raja viral video: नवसाला पावणारा गणपती, अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करीत आहेत. मात्र, या गर्दीला आवरणे पोलिसांनाही कठीण जाताना दिसते.

यापूर्वी देखील चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण करणारा व्हिडीओ समोर आला होता. मात्र आता लालबागच्या राजाच्या दरबारातील आणखी एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक वृद्ध आजी एका कार्यकर्त्याचे पाय धरताना दिसत आहे, त्यानंतर त्या कार्यकर्त्यानं जे केलं त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

A girl amazing dance on the song Salame Ishq Meri Jaan
काय ते एक्स्प्रेशन अन् काय ते ठुमके… ‘सलामे इश्क मेरी जान’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून व्हाल थक्क
Kolkata Metro Viral Video
“बंगालीत नव्हे हिंदीत बोल,” कोलकत्ता मेट्रोमध्ये हिंदी भाषिक…
Sugarcane Farming information happy farmer video viral on social media
आरारारा खतरनाक! ऊस असावा तर असा; ३७ कांड्यांवरती गेला शेतकऱ्याचा ऊस; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
man sharing his food with monkey on viral video on social media
जेवताना अचानक समोर आला माकड, प्राणी पाहतान काकांनी केलं असं काही की…, VIDEO पाहून व्हाल अवाक
HR asks female candidate about marriage plans
एचआरने इंटरव्ह्यूमध्ये तरुणीला लग्नाबाबत विचारला ‘हा’ प्रश्न; वाचून सगळेच संतापले, म्हणाले, “लाजिरवाणे…”
Free Coffee To Customers
‘एक कॉफी फ्री…’ कॅफेत येणाऱ्या ग्राहकांसाठी खास ऑफर; VIRAL VIDEO पाहून कराल कौतुक
Drunk Man Doing Karate Dance At A Wedding Ceremony Funny Video Viral social media
दारू पिऊन सैराट! काकांनी अक्षरश: लुंगी वर करून केला कराटे डान्स; VIDEOचा शेवट पाहून हसू आवरणार नाही
Video an old man dance in varaat wedding by sitting on young mans shoulders
काठी न्‌ घोंगडी घेऊन द्या की रं .. तरुणाच्या खांद्यावर बसून आजोबांचा लग्नाच्या वरातीत भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

यामध्ये चूक कुणाची?

लालबागच्या दरबारात वृद्ध आणि लहान मुलांकरता कोणतीही विशेष व्यवस्था नसल्याचं दिसत आहे. मागे व्हायरल झालेल्या व्हिडीओत भाविक गेटमधून आत येताना थेट एकमेकांच्या अंगावर कोसळताना दिसले. यामध्ये लहान मुलांचेही हाल झाले. तर सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ही वृद्ध आजी रांगेत उभी असलेली दिसत आहे, ती खूप थकलेली असताना मंडळाच्या कार्यकर्त्याचे पाय धरत त्याला विनंती करताना दिसत आहे. वृद्ध महिला बाप्पाच्या दर्शनासाठी अक्षरश: कार्यकर्ता तरूणाच्या पाया पडतेय. पण तो काही तिला दाद देत नाही. वर तो हातानेच पुढे चला पुढे चला असं खुणावताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजीबाई रांगते उभं राहून थकल्या आहेत. त्या तेथील कार्यकर्त्याला प्लीज मला थोडं पुढे जाऊ दे अशी विनंती करताहेत. पण तो काही दाद देत नाही. तुम्हाला रांगेतूनच यावं लागेल असं तो म्हणतोय. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यामध्ये चूक कुणाची?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पालकांचं थोडसं दुर्लक्ष अन् चिमुकली दिसेनाशी झाली; गणपती विसर्जनावेळी नेमकं काय घडलं; VIDEO चा शेवट भंयकर

सोशल मीडियावर हा व्हिडीओ srj_04_01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. यावेळी युजरने कॅप्शनमध्ये घडलेला प्रकार सांगितला आहे. “ही आज्जी इथून आत जाण्याची विनंती करत होती मात्र तिला जाऊ दिलं नाही. मंदिरे ही अशी ठिकाणे आहेत जिथे आपण आपले कुटुंब आणि प्रियजनांना घेऊन जाऊ इच्छितो. पण दुर्दैवाने हे भयानक होत चालले आहे. आपल्याकडे संपूर्ण देशात अनेक मंदिरे आहेत जे लहान जागेत आहेत (जसे की श्री ओंकारेश्वर म.प्र.) संपूर्ण भारतातून आणि त्यापलीकडेही जास्त गर्दी तिथे असते, परंतु त्यापैकी एकाही ठिकाणी असा वाईट अनुभव येत नाही.”

नेटकरीही व्हिडीओ पाहून संतापले आहेत. एकानं कमेंट करत म्हंटलंय “उजवा पाय गरिबांचा डावा पाय श्रीमंतांचा” अशा अनेक संतापजनक कमेंट केल्या आहेत.