Lalbaugha raja viral video: नवसाला पावणारा गणपती, अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करीत आहेत. मात्र, या गर्दीला आवरणे पोलिसांनाही कठीण जाताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी देखील चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण करणारा व्हिडीओ समोर आला होता. मात्र आता लालबागच्या राजाच्या दरबारातील आणखी एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक वृद्ध आजी एका कार्यकर्त्याचे पाय धरताना दिसत आहे, त्यानंतर त्या कार्यकर्त्यानं जे केलं त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये चूक कुणाची?

लालबागच्या दरबारात वृद्ध आणि लहान मुलांकरता कोणतीही विशेष व्यवस्था नसल्याचं दिसत आहे. मागे व्हायरल झालेल्या व्हिडीओत भाविक गेटमधून आत येताना थेट एकमेकांच्या अंगावर कोसळताना दिसले. यामध्ये लहान मुलांचेही हाल झाले. तर सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ही वृद्ध आजी रांगेत उभी असलेली दिसत आहे, ती खूप थकलेली असताना मंडळाच्या कार्यकर्त्याचे पाय धरत त्याला विनंती करताना दिसत आहे. वृद्ध महिला बाप्पाच्या दर्शनासाठी अक्षरश: कार्यकर्ता तरूणाच्या पाया पडतेय. पण तो काही तिला दाद देत नाही. वर तो हातानेच पुढे चला पुढे चला असं खुणावताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजीबाई रांगते उभं राहून थकल्या आहेत. त्या तेथील कार्यकर्त्याला प्लीज मला थोडं पुढे जाऊ दे अशी विनंती करताहेत. पण तो काही दाद देत नाही. तुम्हाला रांगेतूनच यावं लागेल असं तो म्हणतोय. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यामध्ये चूक कुणाची?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पालकांचं थोडसं दुर्लक्ष अन् चिमुकली दिसेनाशी झाली; गणपती विसर्जनावेळी नेमकं काय घडलं; VIDEO चा शेवट भंयकर

सोशल मीडियावर हा व्हिडीओ srj_04_01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. यावेळी युजरने कॅप्शनमध्ये घडलेला प्रकार सांगितला आहे. “ही आज्जी इथून आत जाण्याची विनंती करत होती मात्र तिला जाऊ दिलं नाही. मंदिरे ही अशी ठिकाणे आहेत जिथे आपण आपले कुटुंब आणि प्रियजनांना घेऊन जाऊ इच्छितो. पण दुर्दैवाने हे भयानक होत चालले आहे. आपल्याकडे संपूर्ण देशात अनेक मंदिरे आहेत जे लहान जागेत आहेत (जसे की श्री ओंकारेश्वर म.प्र.) संपूर्ण भारतातून आणि त्यापलीकडेही जास्त गर्दी तिथे असते, परंतु त्यापैकी एकाही ठिकाणी असा वाईट अनुभव येत नाही.”

नेटकरीही व्हिडीओ पाहून संतापले आहेत. एकानं कमेंट करत म्हंटलंय “उजवा पाय गरिबांचा डावा पाय श्रीमंतांचा” अशा अनेक संतापजनक कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalbaugha raja viral video old woman denied ganpati darshan at lalbaugcha raja due to long queue video goes viral srk