अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावरुन आपल्या नात्याची कबुली दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ललित मोदींचा मुलगा रुचिर याने या नात्यासंदर्भात आपलं मत नोंदवलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना रुचिरने आमच्या कुटुंबामध्ये एकमेकांच्या खासगी आयुष्याबद्दल चारचौघांमध्ये बोलायचं नाही असं ठरवलं असल्याचं सांगितलं.
नक्की वाचा >> “मी ललितला फोन करुन विचारलं तुला हे जमलं कसं? तो म्हणाला, मोदी है तो मुमकिन है”
ललित मोदी याचं मिनल सागरानीशी लग्न झालेलं. मिनल यांचं २०१८ साली कर्करोगाने निधन झालं. १९९१ साली ललित मोदी आणि मिनल यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलं आहेत. रुचिरला आलीया नावाची धाकटी बहीणही आहे. रुचिर ललित मोदींसोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. ईटी टाइम्सशी बोलताना रुचिरने थेटपणे आपले वडील आणि सुष्मिता सेन यांच्यामधील नातेसंबंधांवर प्रतिक्रिया दिली नाही. “खरं तर मी यावर काहीच बोलू इच्छित नाही. आमच्या कौटुंबिक धोरणानुसार आम्ही एकमेकांच्या खासगी आयुष्यावर बोलत नाही, असं मी स्पष्ट करु इच्छितो,” असं उत्तर रुचिरने दिलं.
नक्की वाचा >> CM टू सेम…!!! एकनाथ शिंदेंसारखाच दिसतो ‘हा’ उद्योगपती; स्वत: फोटो शेअर करत म्हणाला, ‘सॉरी’ आणि ‘जय महाराष्ट्र’
गुरुवारीच ललित मोदी यांनी सोशल मीडियावरुन सुष्मितासोबतच्या नात्याबद्दलचा खुलासा केला होता. “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौ-यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरु झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” अशा मजकुरासोबत ललित मोदींनी सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर केले होते.
नक्की पाहा >> “माझ्याकडे पाहून लोकांना आम्ही माणसं खातो की काय असा संशय आला”; भाजपा आमदाराच्या भाषणाचा Video Viral
ललित मोदींनी केलेल्या या खुलाश्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून देशाबाहेर असणारे आणि आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका असणारे ललित मोदी आणि सुष्मिता रिलेशनमध्ये असल्याचा मुद्दा सोशल मीडियावरही फारच चर्चेत आहे.