महाराष्टाला इतिहास, लोककला, संस्कृतीची मौल्यवान वारसा राबलेला आहे. महाराष्ट्राचा इतिहास ज्याप्रमाणे पुढच्या पिढ्यांना समजला पाहिजे त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृती देखील समजली पाहिजे. आज आपण ही लोककला जोपासली, संस्कृती जपली तरच नव्या पिढ्यांना तो माहित होईल. पाश्चात्य संस्कृती आणि जीवनशैलीच्या आहारी जात असलेल्या नव्या पिढीमध्ये फार मोजके लोक आहे जे ही कला आणि संस्कृती जोपासतात. अशाच एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होता आहे.
जोगवा, महाराष्ट्राचे एक पारंपरिक लोक नृत्य आहे. हा नृत्य देवी येल्लम्मा की स्तुतीमध्ये सादर केले जाते. जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक संकल्पना आहे. जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. देवीचा म्हणजे अंबा, भवानी, रेणुका आदि शक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो.जोगते व जोगतिणी या प्रथेतील लोकसंस्कृतीचे उपासक मानले जातात. कर्नाटकमधील यल्लम्मा देवीला मुले -मुली सोडण्याची अनिष्ट रूढी परंपरेवर आधारित जोगवा हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील लल्लाटी भंडार हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले होते. आजही हे गाणे कानावर पडताच लोकांचे पाय थिरकू लागतात.
सोशल मीडियावर या गाण्यावर अनेक लोक व्हिडिओ करताना दिसतात. सध्या या गाण्यावर नृत्य करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तरुणांनी भररस्त्यात जोगवा नृत्य सादर केले आहे. तरुणींनी महाराष्ट्राचा पारंपारिक पोशाख असलेली नऊवारी परिधान केली आहे त्यावर पारंपारीक दागिणे परिधान केले आहेत. तरुणांनी पांढरा कुर्ता सलवार परिधान केली आहे. लल्लाटी भंडार गाण्यावर तरुणांनी सादर केले आहे. तरुणांनी अत्यंत प्रंचड ऊर्जा उत्साहाने हे नृत्य सादर केले आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. व्हिडिओ ३ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
नेटकऱ्यांना आवडले नृत्य
एकाने कमेट केले आहे की,” याच गोष्टींमुळे मला महाराष्ट्रीयन लोक आवडतात. मलाही असा डान्स करायचा आहे पण मला येत नाही”
दुसऱ्याने कमेंट केली, “छान डान्स होता”