बंगळुरूमधल्या अत्यंत उच्चभ्रु समजल्या जाणा-या भागात नववर्षांच्या स्वागतासाठी जमलेल्या अनेक महिलांचा ३१ डिसेंबरच्या रात्री विनयभंग करण्यात आला. याचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. या संपूर्ण घटनेने सा-या देशाची मान शरमेने खाली गेली होती. बंगळुरूसारख्या ठिकाणी महिलांसोबत अशा विनयभंगाच्या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता हे प्रकरण ताजे असतानाच बंगळुरुमधला आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरुन येथील घरमालकाने ईशान्य भारतीय मुलीला भर रस्त्यात मारहाण केली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : विनयभंग करणाऱ्या तरुणाला बंगळुरूच्या मुलीने शिकवला धडा

एका ईशान्य भारतीय मुलीला घरमालकाकडून रस्त्यावर मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहींच्या माहितीनुसार या मुलीचे घर मालकाशी पार्किंगच्या कारण्यावरून वाद झाले आणि याच कारणाने या घरमालकाने मुलीला रस्त्यात मारहाण करायला सुरूवात केली. यात आणखी एका व्यक्तीने काठीने देखील या मुलीच्या पायावर वार केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी बंगळुरु पोलिसांनी घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ डिसेंबर २०१६ ची असल्याचे म्हटले जात आहे. विद्यार्थी संघटनांनी याप्रकरणावर आवाज उठवल्यानंतर याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.

VIDEO : छेडछाडीला विरोध करणा-या महिलेला भररस्त्यात मारहाण