आतापर्यंत पैसे देऊन शौचालय वापरण्याच्या सुविधा अनेक देशात आहेत. पण मेलबर्नमधल्या एक घरमालकाने याच्याही पुढे पाऊल टाकले आहे. भाड्याने दिलेल्या घरातील शौचालयात त्याने नाण्यांवर चालणारा फ्लश बसवला आहे. प्रत्येक वेळी नाणी टाकून फ्लश करण्याची सूचना त्याने भाडेकरूंना दिली आहे. आता सोशल मीडियावर हा किस्सा व्हायरल होत आहे.
वाचा : ऐकावे ते नवलच! २०१७ मध्ये निघालेले विमान २०१६ ला पोहोचले
मेलबर्नमध्ये राहणा-या एका तरुणीने रेडिटवर हा किस्सा शेअर केला. आपल्या घरमालकाने शौचालयात नाण्यांवर चालणारा फ्लश लावला असल्याची माहिती तिने दिली. जोपर्यंत त्यात नाणी टाकली जात नाही तोपर्यंत फ्लश वापरू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी फ्लश करताना या तरूणीला त्यात पैसे टाकावे लागत आहे. त्यामुळे वैतागलेल्या या तरूणीने रेडिटवर आपली करुण काहाणी मांडली आहे. एका घरमालकाने असे करणे कितपत योग्य आहे? हे कायदेशीर आहे का? असा सवाल या तरुणीने रेडिटवर विचारला. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी तिने ही पोस्ट टाकली आणि अल्पावधीतच हा किस्सा व्हायरल झाला. पाणी वाचवण्यासाठी आपण असे केल्याचे कारण तिच्या घरमालकाने दिले आहे.
पण काहींच्या मते या तरुणीने सांगितलेला किस्सा हा पूर्णपणे खोटा आहे. आता खरे खोटे काहीच माहित नाही पण या घरमालकाची आणि या किस्स्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
Viral Video : अबब! या वाहतूक कोंडीला म्हणायचे तरी काय