Lappu Sa Sachin Lady Husband: पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर व तिचा भारतीय प्रियकर सचिन मीणा यांच्या प्रकरणात त्या दोघांइतकीच प्रसिद्ध झालेली तिसरी व्यक्ती म्हणजे सचिनची शेजारीण. हल्ली अनेक टीव्ही चॅनेल, युट्युबवर सुद्धा या महिलेची प्रचंड चर्चा आहे. वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे तशी ही महिला सुद्धा आयत्या प्रसिद्धीला एन्जॉय करताना मुलाखती देताना दिसतेय. लप्पु सा सचिन, झिंगूर सा लाडका या दोन वाक्यांमुळे चर्चेत आलेल्या या महिलेचा पती कसा दिसतो याविषयी अनेकांना कुतुहूल होते. सदर महिला ज्या प्रकारे सचिनला सतत टार्गेट करतेय याचा अर्थ तिचा स्वतःचा नवरा अगदी राजबिंडा असेल असेही नेटकरी कयास बांधत होते. काहीजण तर डिवचण्याचा हेतूने एकदा या महिलेच्या पतीला कॅमेरासमोर आणायलाच हवं असंही म्हणत होते.

आता अखेरीस एका व्हिडिओमध्ये लप्पुसा सचिन म्हणणाऱ्या मिथिलेश भाटी या महिलेचा पती उत्तर देताना दिसून आला आहे. साधारण व्हिडिओचं कॅप्शन व त्या व्यक्तीने दिलेले उत्तर ऐकून खरोखरच हा मिथिलेश यांचा नवरा असू शकतो असे वाटते पण अद्याप याची पुष्टी झालेली नाही. या व्हायरल व्हिडिओमध्ये मात्र एक रिपोर्टरने एका व्यक्तीला “तुमच्या पत्नीने सचिनला लप्पु म्हटलं आहे आणि त्यावरून त्या प्रसिद्ध झाल्या आहेत यावर तुमचं काय मत आहे?” असा प्रश्न केला होता. ज्यावर सदर गृहस्थ सुद्धा लाजतच उत्तर देताना पाहायला मिळतोय.

Praveen Trade
Mahakumbh 2025: “अद्भुत अनुभव…”, प्रवीण तरडेंची पत्नीसह महाकुंभमेळ्याला हजेरी; व्हिडीओ केला शेअर, नेटकरी कौतुक करीत म्हणाले…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…
Monalisa Marathi News
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…”
Gautam Adani on son Jeet Adani Diva Jaimin marriage
Gautam Adani Video : मुलाच्या लग्नात सेलिब्रिटिंचा महाकुंभ गोळा होणार का? गौतम अदाणीचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी लप्पु सा सचिन म्हणणाऱ्या महिलेची टिंगल केली आहे. सीमाला तर सचिनपेक्षा याच सुंदर स्वभावाच्या आणि धनवान व्यक्तीशी लग्न करायला हवं होतं असं मस्करीत काहीजण म्हणत आहेत.

हे ही वाचा<< ‘लप्पू सा सचिन..झिंगूर सा लड़का’, डायलॉगने फेमस झालेली ‘ही’ महिला आहे तरी कोण? पाहा फोटो

अलीकडे अनेक माध्यमांनी या महिलेची मुलाखत घेतली होती. यावेळी आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जात असताना जे सुचलं ते सांगितलं म्हणून सचिनला लप्पु म्हटलं असं स्पष्टीकरण सदर महिलेने दिले होते. दुसरीकडे या वाक्यामुळे सचिनला मनस्ताप झाल्याचे म्हणत सीमाने सुद्धा मिथिलेशवर आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याची भूमिका घेतली होती.

Story img Loader