बरेचदा शिक्षणानिमित्त वा नोकरीनिमित्त पुरुषांना घरापासून दूर रहावं लागतं. त्यांना दुसऱ्या शहरात हॉस्टेलला अथवा रुम घेऊन रहावं लागतं. अशा प्रकारे राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, असं बाहेर राहून अभ्यास करता करताच आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणंही आवश्यक असतं. अशा लोकांना शक्यतो बाहेर मेसचं खावं लागतं, मात्र हे आपल्या आरोग्यासाठी किती सुरक्षित असतं याचा आपण कधी विचार करत नाही. हॉस्टेलमध्ये अनेकवेळा निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आढळून आले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे, दरम्यान असाच एक किळसवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिलात तुमचीही चहा पिण्याची इच्छा मरुन जाईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हॉस्टेलमधील काही मुलं चहाची कटली दखावत आहेत. मात्र या किटलीच झाकण उघडताच जे दिसलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ज्या चहाच्या किटलीतून सगळे विद्यार्थी चहा पितात त्या चहाच्या किटलीच्या झाकनात अक्षरश: जीवंत अळ्या झालेल्या आहेत. हे दृश्य बघून कुणालाही किळस येईल. हे इतक भयानक आहे की ही मुलं रोज या किटलीतील चहा पितात. हॉस्टलवर राहणाऱ्यांपैकीच काही विद्यार्थ्यांच्या हा अस्वच्छतेचा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी हा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर भरपूर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ कुठचा आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेच संतापले आहेत. पालक आपल्या मुलांना एवढ्या विश्वासाने हॉस्टेलला पाठवतात मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा खेळ होत असल्याचे पाहायला मिळतंय.