अमेरिकेत लास वेगासमध्ये नुकत्याच झालेल्या गोळीबारात ५९ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते. ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, या अंदाधुंद गोळीबारात एका महिलेच्या दिशेने आलेली गोळी तिच्या आयफोनवर आदळली आणि तिचा जीव वाचला. गोळी लागल्याने आयफोनची मागची बाजू पूर्णपणे फुटली आहे. या फुटलेल्या आयफोनची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये एक व्यक्ती गोळी लागलेला आयफोन हातात धरून उभी आहे. या आयफोनची अवस्था पाहता गोळीच्या वेगाची कल्पना येऊ शकते. या आयफोनने महिलेचा जीव वाचवला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी मिशेल यांचा बराक ओबामांना हृदयस्पर्शी संदेश

येथील मंडाले बे हॉटेलच्या कॅसिनोत रविवारी रात्री संगीत समारंभात झालेल्या गोळीबारात ५९ लोक मृत्यूमुखी तर सुमारे ५३० जण जखमी झाले होते. या हल्ल्यावेळी गायक जेसन एल्डन हा गाणं म्हणत होता. सुमारे २२ हजार प्रेक्षक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा हल्ला ६४ वर्षीय स्टीफन पेडॉकने केल्याचे समोर आले आहे. पोलीस पेडॉकपर्यंत पोहोचण्याआधीच त्याने स्वतःला गोळी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, दहशतवादी संघटना आयसीसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. परंतु, तपास अधिकाऱ्यांच्या मते आतापर्यंतच्या तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याचे निष्पन्न झालेले नाही.

Story img Loader