Double Decker Bus Viral Video : जीवन प्रवासात काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्यापासून दूर गेल्यावर उरतात त्या फक्त त्यांच्या आठवणीच. अशाच प्रकारची एक सुंदर गोष्ट आता इतिहासजमा होत आहे. कारण मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या डबल डेकर बसच्या आता फक्त आठवणीच उरल्या आहेत. डीझेस डबल डेकर बसच्या प्रवासाचा शेवट नुकताच झाला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आता डबल डेकर लालपरी दिसणार नाहीय. या बसच्या शेवटच्या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मरोल डेपोतून डीझेल डबल डेकर बसने आज शेवटचा प्रवास केला. अंतिम प्रवास सकाळी ६.३० वाजता सुरु झाला होता. याचदरम्यान शेवटचा प्रवास करणाऱ्या या बसला फुग्यांचा माळा लावून सजवण्यात आलं होतं. लालपरीचा शेवटचा प्रवास पाहून लोक भावनिक झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाही. बसचा हा सुंदर व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर विरल भयानी नावाच्या यूजरने बसचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला २ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. तसंच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, हे फक्त मुंबईकरांसाठी एक इमोशन आहे. तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, या बसला बंद करू नका. मी तर या बसमध्ये बसलो नाही. तर तिसऱ्या एकाने म्हटलं, या बससोबत बालपणीच्या आठवणीही गेल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last journey of mumbai double decker buses after 86 years of service emotional moment for mumbaikars lalpari video viral nss
Show comments