Viral video: आजच्या जगात ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. हल्ली घर बसल्या ऑर्डर देऊन लोक वस्तू खरेदी करत आहेत. दरम्यान तुम्हालाही हा अनुभव आला असेल की आपण एखादी गरजेची गोष्ट घेण्यासाठी ऑर्डर करत असतो. त्यावेळी आणखी चार गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळतात. मग इथे येतो चंगळवाद… एखादी गोष्ट गरजेची नसते पण आपलं मन ऐकत नाही आणि आपण केवळ आकर्षित दिसतंय किंवा हवंहवंस वाटतं म्हणून घेऊन टाकतो. हल्ली बाजारात इतके वेगवेगळे प्रकारची उत्पादन आली आहेत की बघून आश्चर्य वाटतं. आता हेच बघा ना..तुम्ही आतापर्यंत उशी, गादी, फ्रीज जास्तीत जास्त गाडीच्या सीट्सचे कव्हर पाहिले असतील.. या सगळ्यांवर धूळ किंवा किटाणू बसतात म्हणून आपण त्यांना कव्हरने झाकून ठेवतो. मात्र तुम्ही कधी पंख्याचं कव्हर पाहिलंय का? नाही ना…मग हे बघा आता चक्क पंख्यासाठीचं कव्हर आलं आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणीने मीशो या ऑनलाईन शॉपींग अॅपवरील या प्रोडक्टची माहिती दिली आहे. पंख्यावर धुळ साचण्याच्या समस्या प्रत्येक घरात असतात. प्रत्येक महिन्याला उंच टेबलवर चढून पंखा साफ करावा लागतो. कधी-कधी सीलिंग फॅन खूप घाण होतात. त्यांच्यावर कार्बनयुक्त धुळीचा जाड थर साचू लागतो. असे असतानाही सिलिंग फॅनच्या साफसफाईकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. सीलिंग फॅन साफ करणे हे खूप अवघड काम आहे, त्यामुळे बरेच लोक ते टाळतात.

व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कव्हरमुळे तुमच्या फॅनवर अजिबात धुळ साठणार नाही. तसेच घरामध्ये फॅन दिसताना देखील छान दिसेल. कव्हर खराब झाल्यानंतर तुम्ही ते धुवून पुन्हा फॅनवर लावू शकता. मीशोवर हे कव्हर सध्या २०० रुपयांना मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! इकडे मगर, तिकडे सिंह; हरणानं स्वतःला कसं वाचवलं? पाहा VIDEO

तुम्हीही हे कव्हर एकदा नक्की ट्राय करुन बघा. त्यामुळे सिलिंग फॅनवर साचलेली घाण निघून जाईल आणि घाणही खाली पडणार नाही.