Anand Mahindra Tweet: भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा(Anand Mahindra) हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते दररोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खूप पोस्ट करताना दिसतात. कधी देशातील गंभीर समस्या आपल्या माध्यमातून मांडतात तर कधी एखादा व्हिडीओ शेअर करत त्याची गोष्ट सांगताना दिसतात. आताही त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी मजेशीर आणि नाविन्यपूर्ण आहे.

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे

आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचे मुख्य डिझायनर प्रताप बोस यांना कंपनीच्या अभियांत्रिकीबद्दल एक विशेष प्रश्न विचारला आहे. गावात बनवलेल्या इलेक्ट्रिक बाइकचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. यात चालकासह ६ लोक बसतात. कल्पना करा जर आपल्याला फक्त १०,००० रुपयांमध्ये बनवलेली अशी इलेक्ट्रिक बाईक मिळू शकते आणि त्यात ६ लोक एकत्र बसू शकतात, ती देखील एका चार्जमध्ये १५० किमी पर्यंत धावू शकते, हे किती छान आहे? त्यांना ही बाईक खूपच आवडली आहे.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”

काय खास आहे ‘या’ इलेक्ट्रिक बाईकमध्ये?

व्हिडिओमध्ये या इलेक्ट्रिक बाइकवर चालकासह ६ लोक बसू शकतात. यासोबतच ती एका चार्जमध्ये १५० किमी जाते आणि ८ ते १० रुपयांमध्ये फुल चार्ज होते असेही सांगण्यात आले आहे. त्याच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाले तर त्यात फिचर्स खूप कमी आहेत, पण हा पर्याय खूप चांगला आणि नवीन आहे. त्याची किंमत केवळ १० ते १२ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

( हे ही वाचा: Video: नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा जिममध्ये खतरनाक व्यायाम; दोन्ही पाय हवेत नेले अन…)

( हे ही वाचा: तब्बल ९ तास उशिराने आली ट्रेन! प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवरच सुरू केला डान्स, Video व्हायरल)

आनंद महिंद्रा यांनी चीफ डिझायनरला विचारले ‘हे’ प्रश्न

हा बाईकवरून आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कंपनीचे मुख्य डिझायनर प्रताप बोस, ज्यांनी महिंद्रा XUV700 आणि Mahindra Scorpio सारख्या गाड्यांचे डिझाईन केले, त्यांना सांगितले की, डिझाइनमध्ये थोडा बदल केल्यानंतर, चेसिससाठी एक सिलेंडिरिकल सेक्शन बनवून, ही बाईक सर्वत्र वापरली जाऊ शकते. ती युरोपमधील व्यस्त पर्यटन केंद्रांवर ‘टूर बस’ म्हणून वापरली जाऊ शकते. यासोबतच ते म्हणाले की, खेड्यापाड्यात आणि ग्रामीण भागातील वाहतुकीच्या नवनवीन शोधामुळे मी नेहमीच प्रभावित होतो.