Viral video: लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. अशाच दोन तरुणींची जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे.

लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. घुंगरांचे बोल…ढोलकीचा ताल…घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत या तरुणींनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे,

Groom bride dance video in there haldi on Khandeshi song video goes viral on social media
VIDEO: “करमन लगन” खानदेशी गाण्यावर नवरा-नवरीनं हळदीला केला भन्नाट डान्स; नातेवाईकही पाहतच राहिले
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Dance video of a woman dancing in Mumbai local on aagri koli song video viral on social media
आगरी-कोळी गाण्याचा नादच भारी! मुंबई लोकलमध्ये महिलेचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक
Groom Dance With Sister In Law on marathi song Comedy Video goes Viral on social media
“मी तर प्रेम दिवाणा रसिला, दे प्यार जरासा नशिला” भर मांडवात दाजी अन् मेहुणीची जुगलबंदी; VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं
School teacher dance on marathi song pavan jevala kay song with student school video goes viral
पाव्हणं जेवला काय? जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO पाहून म्हणाल शिक्षक असावा तर असा!
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
splash cold water
क्रूरतेचा कळस! रेल्वे फलाटावर झोपलेल्या बेघरांवर ओतलं थंड पाणी; चिमुकली मुलं ओल्या कपड्यांत थंडीत कुडकुडली!
In pune boy drive scooty with holding silencer in hand indian jugaad
VIDEO: हे फक्त पुण्यातच होऊ शकतं! सायलेन्सर हातात पकडून चालवतायत स्कूटी; पुणेरी जुगाड पाहून डोक्याला हात लावाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता “अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी” या गाण्यावर या तरुणींनी ही भन्नाट अशी लावणी सादर केली आहे. यावेळी त्या फक्त लावणी करत नाहीयेत तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या आदाही आपल्याला भुरळ घालत आहेत. लावणीच्या बोलाप्रमाणे या तरुणी आपले हावभाव बदलत आहेत. या तरुणी चक्क नऊवारी नेसून डान्स करत आहेत. त्यांनी इतका अप्रतिम डान्स केलाय की जो पाहून प्रत्येकजण कौतुक करेल. या तरुणींचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. या तरुणींनीही असंच सादरीकरण केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>“मी तर प्रेम दिवाणा रसिला, दे प्यार जरासा नशिला” भर मांडवात दाजी अन् मेहुणीची जुगलबंदी; VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं

हा व्हिडीओ archu_gavali84 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावर नेटकरीही भरभरून कमेंट करत आहेत. यावेळी एका युजरने म्हंटलं, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशीच जपा. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली “जबरदस्त लावणीचा ठसका” तर आणखी एकानं काय ती ‘कातील अदा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader