केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी नेटकऱ्यांना त्यांच्या नृत्याची झलक दाखवली आहे. त्यांनी त्यांच्या नृत्याचा व्हिडीओवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच कौतुक केलं आहे. त्यांच्या नुकत्याच झालेल्या काजलांग गावाच्या भेटीच्या वेळेचा हा व्हिडीओ आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत अरुणाचल प्रदेशच्या खासदारानी ईशान्य भारतातील लोकगीते आणि नृत्य “प्रत्येक समाजाचे सार” कसे आहेत याबद्दल दिसून येते.

“विवेकानंद केंद्र विद्यालय प्रकल्पांचे निरीक्षण करण्यासाठी माझ्या सुंदर काजलंग गावाच्या भेटीदरम्यान. जेव्हाही पाहुणे त्यांच्या गावाला भेट देतात तेव्हा हे साजोलंग लोकांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करतात. मूळ लोकगीते आणि नृत्य हे अरुणाचल प्रदेशातील प्रत्येक समुदायाचे सार आहेत.” असं ते सांगतात.

व्हिडीओ व्हायरल

१.१४ मिनिटांच्या क्लिपमध्ये, किरेन रिजिजू हे स्थानिक लोकांच्या उत्साहासह गाण्यांच्या तालावर छान नृत्य करताना दिसत आहेत. ऑनलाइन शेअर केल्यावर क्लिप व्हायरल व्हायला वेळ लागला नाही.

पंतप्रधानाचे ट्विट

या क्लिपने पंतप्रधान मोदींचेही लक्ष वेधले, ज्यांनी रिजिजू च्या नृत्य कौशल्याची स्तुती करत क्लिप पुन्हा ट्विट केली. “आमचे कायदे मंत्री किरेन रिजिजू देखील एक डीसंट डान्सर आहेत! अरुणाचल प्रदेशची चैतन्यशाली आणि गौरवशाली संस्कृती पाहून आनंद झाला, ”असे त्यांनी ट्विट केले.

व्हिडीओ बघा:

नेटीझन्सने मंत्री किरेन रिजिजू यांच्या डान्सच्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे.

अनेकांना किरेन रिजिजू हे उत्तम डान्सर आहेत असं मत व्यक्त करतात.

किरेन रिजिजू यांच्या डान्ससोबतच त्यांच्या व्हिडीओमधून भारतातील संस्कृतीचेही दर्शन होत आहे. पारंपारिक डान्ससह व्हिडीओ मधून झालेले हे संस्कृतीचे दर्शन नेटीझन्स खूप आवडले आणि यामुळेच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Story img Loader