लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वांसाठी पर्वणीचा दिवस असतो. रविवारी प्रदोषकाळ सायंकाळी. ६.०५ पासून रात्री ८.३६ पर्यंत आहे. या काळात शुभ अमृत हे दोन योग आहेत त्यानंतर सायंकाळी ७.१० पासून वृषभ स्थिर लग्न असल्यामुळे हा काळ देखील पूजेसाठी शुभ असणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाल दिसल्यास कुंकू, अक्षता वाहून तिची पूजा केल्याने भरभराटी मिळते असा देखील समज आहे. दिवाळीच्या दिवशी सकाळी महालक्ष्मी मंदिरात वस्त्र चढवून सुवासिक उदबत्ती लावली जाते. लक्ष्मी पूजनात नऊ गोमती चक्र ठेवून नंतर ते तिजोरीत ठेवल्याने भरभराट होते, असा देखील समज आहे. त्यामुळे ही परंपराही काही भागात दिसून येते. लक्ष्मी पूजन करताना चण्याची डाळ देवी लक्ष्मीवर वाहून पूजा झाल्यावर ही डाळ पिंपळाच्या झाडाला चढवली जाते. सकाळी ९.३० ते ११.०० (लाभ) सकाळी ११.०० ते ११.३० (अमृत) दुपारी २.०० ते ३.३० (शुभ) सायंकाळी ६.३० ते ८.०० (शुभ) रात्री ८.०० ते ९.१५ (अमृत) असे लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा