आज २१ जून म्हणजे जागतिक योगदिन. जगभरामध्ये आज योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मैदानांमध्ये तसेच सभागृहांमध्ये योगसाधना करण्यात आली. सोशल नेटवर्किंगवरही आज सकाळपासूनच योगदिनाची चर्चा आहे. #YogaDay2019, #InternationalDayofYoga, International Yoga Day, #WorldYogaDay हे हॅशटॅग आणि टॉपिक काल संध्याकाळपासूनच ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहेत. योगदिनानिमित्त अनेक नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी सामान्यांना योगसाधना करण्याचा सल्ला देतानाच योग करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. मात्र याबरोबर आजच्या दिवसानिमित्तचे खास विनोदही ट्विटवर अनेकांनी पोस्ट केले आहेत. या सर्वांमध्ये विशेष चर्चा आहे ती मराठी  चित्रपटातील सर्वात सुपरहीट जोडी असणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या एका व्हिडिओची. या व्हिडिओमध्ये हे दोघे चक्क योगासने करताना दिसत आहेत. अर्थात हा व्हिडिओ एका चित्रपटातील आहे हे वेगळं सांगायला नको.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ म्हणजे मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक भन्नाट भागीदाऱ्या करणारी जोडी. या दोघांचे सिनेमे आजही मराठी प्रेक्षक आवर्जून पाहतात. टायमींग, संवाद फेकण्याची कला, हावभाव सगळच्याच गोष्टींनी या दोघांनी मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवले. आज योगदिनानिमित्त या दोघांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ या चित्रपटातील एका दृष्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे हे दोघे चालाखी करुन उपस्थितांना इम्प्रेस करण्यासाठी जुगाड करताना दिसत आहेत. लक्षा म्हणजेच चित्रपटामध्ये सारंग हा उपस्थितांसमोर योगासने करताना दिसत आहे. मात्र त्याचे पाय म्हणून त्याने पुढे केलेले पाय हे स्टेजवरील पडद्यामागे झोपलेल्या अशोक सराफ (म्हणजेच चित्रपटातील विलासचे) यांचे आहेत. योग प्रात्यक्षिके दाखवताना स्टेजवर बसलेला सारंग त्याच्या मागे लपलेल्या विलासचे पाय अगदी जोरात खेचत स्वत:च्या गळ्यात वगैरे घालून योगासने येत आसल्याच्या आव आणताना दिसत आहे. मात्र त्याच्या याच आत्मविश्वासा फटका विलासला बसत असून पायांवर होणाऱ्या अत्याचारामुळे स्टेजच्या मागेच तो ओरडताना दिसत आहे. या प्रसंगामध्ये सारंग म्हणजेच लक्षा भाव खाऊन जातो उपस्थितांच्या टाळ्या मिळवतो आणि पडद्यामागील खरा हिरो असणारा विलास पाय दुखत असल्याने ओरडताना दिसतो. ‘झी टॉकीज’नेही फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. योगदिनाचे औचित्य साधून पोस्ट केलेल्या या व्हिडिओला हजारोंच्या संख्येने शेअर्स आणि लाईक्स मिळाले असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडिओ

दरम्यान, एकीकडे योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात असतानाच इंटरनेटवर अनेकांनी योगदिनानिमित्त विनोदी ट्विटसही केले आहेत. त्यामुळे काहींनी योगदिनानिमित्त प्रत्यक्षात योगासाने करुन तो साजरा केला तर काहींना नेटवर विनोद शेअर करुन हा दिवस हसत साजरा केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxmikant berde ashok saraf movie scene went viral on international yoga day scsg