इन्स्टाग्रामवर सध्या लेझी लॅड गाण्यानं धुमाकूल घातला आहे. तुम्ही इन्स्टाग्रामचे युजर्स असाल तर आतापर्यंत सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे रिल्स तुम्ही बघितले असतील. इन्स्टाग्रामवर लेडी लॅड गाण्याचं चॅलेंज स्वीकारत सेलिब्रिटींसह सामान्य नेटकरी थिकरताना दिसत आहेत. विद्या बालन आणि इमरान हाश्मी यांची भूमिका असलेल्या घनचक्कर या चित्रपटातील लेझी लॅड हे गाणं आहे. या गाण्यावर विचित्र स्टेप्स करताना नेटकरी दिसत आहेत. सध्या इन्स्टाग्रामवर लेझी लॅड गाण्याचं आव्हान स्वीकारत मजेदार आणि विचित्र स्टेप्स करताहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती या गाण्यावरील आपले रिल्स शेअर करत आहेत. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री हीनेही या गाण्याचं चॅलेंज स्वीकारत ठेका धरला. झाईद दरबार आणि गौहर खान यांनीही ठेका धरला. अभिनेत्री अशनूर कौरही या गाण्यावर थिरकताना दिसली. त्याचबरोबर बालकलाकार देशना दुगडही नाचली.

नेटकरीही या गाण्यावरील रिल्सला पसंती देत आहेत. काही मजेशीर डान्स आपल्या पेजवर शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lazy lad dance challange reels viral video rmt