Leap Day Google Doodle : गुगलने आ २९ फेब्रुवारी रोजी एका खास डूडलसह लीप डे साजरा केला जो चुकवता येणार नाही. हा अनोखा दिवस, जो दर चार वर्षांनी फक्त एकदा येतो. गुगलच्या लीप डेसाठीच्या डुडलमध्ये एक खेळकर बेडूक दिसत आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या डुडलमध्ये चतुराईने लीप डेची तारीख वापरली आहे.
आजच्या डुडलमध्ये एक खास बेडुक दिसत आहे त्याच्यावर २९ तारीख लिहिली आहे. बेडकाने उडी मारली ती २९ तारीख गायब होत आहे. संपूर्ण डुडलमध्ये २८, २९ फेब्रुवारी आणि १ मार्च या तारखा दिसत आहे. लीप डेला गुगडच्या डुडलमध्ये एक तलावही दिसत आहे ज्यात काही दगड, कमळाचे फुलही दिसत आहे. त्यामध्ये कमळाच्या पानांमध्ये Google शब्दाचे अक्षरे दिसत आहे. या डूडलवर क्लिक केल्यावर नंतर २९ तारीख स्क्रिवर मोठी झाल्याची दिसते. त्यानंतर कमळाच्या पानावर बसलेले बेडूक तलावाबाहेर उडी मारतो आणि २९ तारखेला आणि बेडुक दोन्ही गायब होते.
गूगलचे हे डूडल तुम्ही शेअर करू शकता. ४ वर्षानंतर एक लीप वर्ष येते आणि फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस होते. लीप वर्षात, फेब्रुवारीचा शेवटचा दिवस २९ लीप डे असल्याचे म्हटले जाते. पुढील लीप वर्ष २०२८ मध्ये असेल.
हेही वाचा – नासाने शेअर केला अंतराळातून काढलेला पृथ्वीचा आश्चर्यकारक फोटो, पाहा बर्फाने झाकलेला हिमालय अन्…
ज्युलियन कॅलेंडरचा परिणाम म्हणून लीप डे आला, जो ४६ बीसीई(बीसीई) मध्ये सुरु झाला होता. ज्युलियन कॅलेंडरमध्ये पृथ्वीला सूर्याभोवतीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवसांपेक्षा जास्त वेळ लागतो हे तथ्य नाही. लीप डे नसेल तर ऋतूंचा अंदाज लावता येणार नाही. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करताना ऋतुचा अंदाज बांधता येत नाही.