Leap Year 2024 : ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस येत जास्त येतो तेव्हा त्या वर्षाला लीप वर्ष म्हटले जाते. यंदा २०२४ हे वर्ष लीप वर्ष आहे. लीप वर्षबाबत अनेक प्रथा आणि अंधश्रद्धाही निर्माण झाल्या आहेत.

१६ व्या शतकापासून लीप वर्षे अस्तित्वात आहे, जो ग्रेगोरियन कॅलेंडरचा एक आविष्कार आहे. लीप वर्ष हे सहसा ४ वर्षांनी येते. ज्या वर्षात ३६६ दिवस असतात ते लीप वर्ष असते. अन्य वर्षांमध्ये ३६५ दिवस असतात. लीप वर्षातील जास्तीचा दिवस फेब्रुवारी महिन्यात जोडला जातो. सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यात सहसा २८ दिवस असतात पण लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी साधारण ३६५.२४२२ दिवस लागतात म्हणजेच पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवसांपेक्षा जास्त काळ लागतो. दरवर्षी सुमारे सहा तास जास्तीचे वाढतात असे मानले जाते. म्हणून कालगणनेत चूक होऊ नये म्हणून लीप वर्षात अतिरिक्त दिवसाचा समावेश केला जातो.

लीप दिवस नसेल तर ऋतूंमध्ये सुंसगता निर्माण होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला त्यांच्या पिकांचा अंदाज घेता येणार नाही आणि शाळांना सुट्ट्यांही मिळणार नाही. लीप दिवसाबाबत लोकांच्या अनेक मान्यता आहेत, चला त्याबाबत जाणून घेऊया.

२९ फेब्रुवारीला जन्मलेले लोक चिरतरुण असतात

लीप दिवशी म्हणजे २९ फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या बाळ जन्माला येणे म्हणजे त्याचा वाढदिवस इतरांपेक्षा चार पट कमी असू शकतो, परंतु काही जणांनी दावा केला आहे की, “ही चिरतरुण राहण्याची गुरुकिल्ली आहे.” सुमारे १५०० पैकी एका बाळाचा जन्म लीप दिवशी होण्याची शक्यता असते.

हेही वाचा – Leap Year 2024 : फेब्रुवारी महिन्यात २८ किंवा २९ दिवस का असतात? हे आहे कारण…

२९ फेब्रुवारी दिवशी या देशात महिला करतात पुरुषांना प्रपोज

आयर्लंडमध्ये, २९ फेब्रुवारी हा दिवस ‘बॅचलर डे’ किंवा ‘लेडीज प्रिव्हिलेज’ म्हणून ओळखला जातो. या दिवसाची खास परंपरा अशी आहे की या दिवशी स्त्रिया पुरुषांना प्रपोज करू शकतात. काही महिला पुरुषांना फक्त “होकार्थी” उत्तर देण्याची परवानगी असल्याचा दावा करतात, तर काही महिलाला पुरुषांना नकार देण्यासाठी मान्यता देतात. परंतु त्यांच्या चाहत्याला भेटवस्तू खरेदी करणे आवश्यक आहे. २००४ मध्ये आयरिश सरकारने २९फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या प्रत्येक मुलाला १०० युरो भेट देऊन कुटुंबासाठी आंतरराष्ट्रीय वर्षाचा १० वा वर्धापन दिन साजरा केला.

२९ फेब्रुवारी दिवशी ग्राहकांना लुटता येतो विशेष ऑफर्सचा आनंद

कॅलेंडरवरील दुर्मिळ दिवस देखील व्यवसायांना व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करण्याची संधी आहे. ईशान्य यूएसमध्ये, ‘लीगल सी फूड्स रेस्टॉरंट चेन’तर्फे २९ फेब्रुवारी रोजी प्रदेशातील आवडता खाद्यपदार्थ, लॉबस्टरवर सवलत दिली आहे. पिझ्झा चेन पापा जॉन्सने २००८ मध्ये ‘आपला परफेक्ट पॅन पिझ्झा’ या टॅग लाइनसह लॉन्च करण्यासाठी लीप दिवस साजरा केला. ” या दिवशी हॉटेल्स आणि फ्लाईटसाठी देखील विशेष ऑफर्स दिल्या जातात.

हेही वाचा – Leap Year 2024 : २९ फेब्रुवारी लीप इयर निमित्त काही वैज्ञानिक माहिती; लीप इयर बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

अतिरिक्त दिवसाची गणना सिस्टम करू शकत नाही

एका दशकात सुमारे दोनदा अतिरिक्त दिवस येण्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. २९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात प्रणालीतील त्रुटींची (system errors) एक भयानक घटना घडली. यामध्ये जपानच्या हवामानविषयक संस्थेने चुकीचा हवामान अहवाल पाठवला होता आणि मॉन्ट्रियलची कर सेवा बंद झाली या घटनांचा समावेश होतो.

Story img Loader