Leap Year 2024 : कॅलेंडर हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. कॅलेंडर अस्तित्वात नसते तर.. ही कल्पनाही आपण करू शकत नाही. महिना, तारीख आणि वार पाहण्यासाठी कॅलेंडर हे अतिशय महत्त्वाचे आहे. वर्षातील १२ महिन्यांमध्ये फक्त फेब्रुवारी सोडला तर इतर महिन्याला ३० किंवा ३१ दिवस असतात पण तुम्ही कधी विचार केला का की फेब्रुवारी महिन्यात २८ किंवा २९ च दिवस का असतात? आज आपण त्या मागील कारण जाणून घेणार आहोत.

फेब्रुवारी महिन्यात २८ किंवा २९ दिवस का असतात?

जानेवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये ३० किंवा ३१ दिवस असतात पण फेब्रुवारी हा एकच असा महिना आहे ज्यामध्ये २८ किंवा २९ दिवस असतात.
आपण जे कॅलेंडरचा वापर करतो ते रोमन कॅलेंडर आहे. जुन्या रोमन कॅलेंडरमध्ये एक वर्षात १० महिने असायचे म्हणजेच ३०४ दिवस होते. त्यानंतर रोमन किंग न्यूमा पोम्पीलियसने यामध्ये दोन महिन्यांचा समावेश करण्यात आला. ते दोन महिने होते जानेवारी आणि फेब्रुवारी. असं म्हणतात की रोमन लोकं सम संख्या ही अशुभ आहे त्यामुळे एक तर या दोन महिन्यांमध्ये २९ दिवस असावेत किंवा ३१ दिवस असावेत पण ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण करण्यासाठी एका महिन्याचे दिवस हे सम संख्येत असणे गरजेच होते. त्यामुळे फेब्रुवारी हा महिना २८ दिवसांचा निवडण्यात आला.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

हेही वाचा : पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

लीप वर्ष

फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस का असतात, हे आपण जाणून घेतले पण २९ दिवसाच्या फेब्रुवारी महिन्याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्हाला लीप वर्ष ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी ३६५ आणि सहा तास लागतात. अशात वर्षाचे संतुलन ठेवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आणखी एका दिवसाचा समावेश केला जातो. ज्यामुळे २८ दिवसाचा फेब्रुवारी महिना २९ दिवसाचा होतो ज्याला आपण लीप वर्ष म्हणतो.