Viral Video : भाकरी हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रात आवडीने ठेचा, झुणका, वांग्याच्या भरीताबरोबर भाकर खाल्ली जाते. भाकरी या वेगवेगळ्या धान्याच्या पीठांपासून बनवल्या जातात. काही लोकांना बाजरीची भाकर आवडते तर काही लोकांना नाचणीची भाकर आवडते. ज्वारीची भाकर तर अनेकांना आवडते. काही लोकांना भाकरी खायला आवडतात पण कशी बनवावी, हे कळत नाही. पण टेन्शन घेऊ नका सध्या एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी त्यांच्या गावरान पद्धतीने भाकरी बनवताना दिसत आहे. आजीला भाकरी बनवताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ पाहून काही जणांना भाकरी कशी बनवावी, हे सहज समजेल. हा व्हिडीओ पाहून अनेकांना गाव आठवेल तर काही लोकांना त्यांच्या आजीच्या हातच्या भाकरी खाण्याची आवड होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजी चुलीवर भाकरी बनवत आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, चुल पेटलेली आहे आणि आजी पेटत्या चुलीवर गरम तव्यावर भाकरी भाजताना दिसत आहे. पुढे आजी मळलेल्या पीठापासून भाकरी बनवताना सुद्धा दिसते.परातीमध्ये ती सुरुवातीला पीठ मळताना दिसते आणि त्यानंतर भाकरी बनवताना दिसते. परातीमध्ये भाकरी थापते. आजी परातीमध्ये भाकरी गोल गोल फिरवताना दिसून येते. त्यानंतर हातावर भाकरी थापताना दिसते. आजीची भाकरी थापण्याची पद्धत पाहून तुम्हालाही तुमच्या आजीची आठवण येऊ शकते. आजीने नऊवारी नेसली असून डोक्यावर पदर घेतला आहे.
हेही वाचा : मिसळप्रेमी आजी आजोबा! चमचमीत मिसळचा आनंद घेणाऱ्या वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल
gavakadachi_gost या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भाकरी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गावातील जेवणाची मला खूप आठवण येत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मला खूप आवडते हातावरची भाकरी” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान आजी” गावाकडची गोष्ट या अकाउंटवरुन अनेक गावाकडील गोष्टींचे व्हिडीओ शेअर केले जातात. या व्हिडीओवर यूजर्स भरपूर लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.