leopard and crocodile fight: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं.लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिबट्या,आणि मगर यांच्या लढाईचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओध्ये तुम्ही पाहू शकता, हे दोन्ही प्राणी एकापेक्षा एक आहेत. यातल्या प्रत्येकाचंच वेगळं अस्तित्व आहे. मगरही विशाल आहे तर बिबट्या हा देखील जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो. आता हे दोघे आमने-सामने आल्यावर शेवटी कोण जिंकलं तुम्हीच पाहा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या एका तळ्यात पाणी पित आहे, यावेळी याच पाण्यात आपली शिकारीसाठी कुणीतरी वाट बघतंय याचा अंदाजही त्याला नाही. बिबट्या निवांत पाणी पित असतानाच पाण्यात लपून बसलेली मगर बिबट्याच्या जबड्यावरच हल्ला करते. पुढे मगर बिबट्याला पाण्यात घेऊन जाते. आता तुम्हाला वाटत असेल बिबट्याची शिकार अखेर मगरीने केलीच, मात्र थांबा काही वेळातच बिबट्या आपली ताकद दाखवत मगरीला आस्मान दाखवतो. मगर आणि बिबट्याच्या लाढईचा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> समुद्रात आयफोनचा कंटेनर पलटी; लोकं अक्षरश: तुटून पडले, संतापजनक VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @tazeemkingkhan786 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “हरणाच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “म्हणून जास्त हवेत जायचं नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard and crocodile fight shocking video goes viral on social media you will be amazed see vibration leopard and crocodile srk